Type Here to Get Search Results !

मांडवे येथे महापुरुषांच्या प्रतिमा विटंबना प्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी


पहूर प्रतिनिधी- ता. जामनेर 

दिशा लाईव्ह न्यूज :-: जामनेर तालुक्यातील मांडवे येथे महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना केल्याच्या प्रकरणात पहूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी दर्शन नाना पवार यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मांडवे येथे अज्ञात व्यक्तींनी महापुरुषांच्या बॅनरची विटंबना केल्याची घटना समोर आल्यानंतर पहूर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी दर्शन नाना पवार यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

याप्रकरणी संजय लक्ष्मण लोखंडे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेनंतर पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दात्रे तसेच तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

या प्रकरणाचा पुढील तपास पहूर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments