Type Here to Get Search Results !

रोटवद-लोहारा पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया; प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी



दिशा लाईव्ह न्यूज :- : रोटवद येथे लोहारा पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने गेल्या काही दिवसांपासून पाण्याची सतत धार सुरू असून, दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. रोटवद बसस्थानकाजवळ  (गर्जना शाखेच्या बोर्ड जवळ ) तसेच पुढे फरशी पुलाजवळही पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

वाघूर येथून रोटवद  मार्गे-लोहारा गावासाठी पाणीपुरवठ्याची ही योजना स्व. मा. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांच्या कार्यकाळात यशस्वीपणे पूर्ण झाली होती. मात्र पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून, याकडे संबंधितांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

आज सकाळी रोटवद येथील मा. सरपंच कैलास दांडगे यांनी याबाबत दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर संबंधित विषयाची तातडीने दखल घेत लोहारा ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ कर्मचारी रवीभाऊ पाटील तसेच पाचोरा येथील ठेकेदार रवीभाऊ केसवणी यांच्याशी संपर्क साधून पाईपलाईनची दुरुस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

पाणी हे अत्यंत मौल्यवान नैसर्गिक साधन असून, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणे चिंताजनक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाईपलाईनची पाहणी करून दुरुस्ती करावी आणि पाण्याची नासाडी थांबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments