पहूर प्रतिनिधी-- (ता. जामनेर)
दिशा लाईव्ह न्यूज -:---शेरी (ता. जामनेर )येथे ३५ वर्षीय तरुणाचा राहत्या घरात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास घडली. राजू रघुनाथ कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे.
राजू कोळी हे गुरुवारी सकाळी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत पोलीस पाटील यांनी पहूर पोलिसांना खबर दिली. त्यानंतर राहुल पाटील व अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन राजू कोळी यांना उपचारासाठी पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी तपासणी केली असता राजू कोळी यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास राहुल पाटील करीत आहेत. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही .

Post a Comment
0 Comments