Type Here to Get Search Results !

सेवा संकल्प अभियानांतर्गत पहूर ग्रामीण रुग्णालयात बाल आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात ३७ बालकांची आरोग्य तपासणी; २ बालकांना NRC तर ५ बालकांना DEIC जळगाव येथे संदर्भित


दिशा लाईव्ह न्यूज -:- : सेवा संकल्प अभियानांतर्गत पहूर ग्रामीण रुग्णालय येथे सॅम (Severe Acute Malnutrition) व मॅम (Moderate Acute Malnutrition) बालकांसाठी विशेष बाल आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मा. डॉ. सचिन भायेकर सर यांच्या सूचनेनुसार तसेच मा. डॉ. राजेशदादा सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.

या शिबिरासाठी जामनेर येथील आर.बी.एस.के. टीम क्रमांक २, ४ आणि ५ यांच्या सहकार्याने सॅम व मॅम बालकांची तपासणी करण्यात आली. पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलकंठ महाजन सर यांनी शिबिरात सहभागी झालेल्या बालकांची प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्यस्थितीचा आढावा घेतला.


शिबिरामध्ये एकूण ३७ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गंभीर कुपोषणाच्या श्रेणीत असलेल्या २ सॅम बालकांना पुढील उपचार व आवश्यक वैद्यकीय देखरेखीसाठी NRC, जळगाव येथे संदर्भित करण्यात आले. तसेच आवश्यक विशेष तपासणी व उपचारासाठी ५ बालकांना DEIC, जळगाव येथे संदर्भित करण्यात आले.

दरम्यान, ३१ मॅम बालकांना औषधोपचार तसेच आहार व्यवस्थापनाबाबत आवश्यक सल्ला देण्यात आला. बालकांच्या आरोग्यविषयक समस्या वेळेत ओळखून त्यावर योग्य उपचार करणे, तसेच कुपोषणाची तीव्रता कमी करण्यासाठी नियमित आहार, पोषणमूल्य असलेले पदार्थ आणि आरोग्यविषयक काळजी घेणे याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

         पालकांना पोषण व बाल आरोग्याबाबत मार्गदर्शन

यावेळी पालकांना बालकांच्या आरोग्याची नियमित तपासणी, संतुलित आहार, स्वच्छता, आवश्यक औषधोपचार आणि कुपोषणाची लक्षणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. डॉ. एन. डी. महाजन सर यांनी पालकांना पोषण व बाल आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी योग्य व सकस आहाराचे महत्त्व समजावून सांगितले.

कुपोषणाची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधणे, तसेच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपचार व आहार व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

         आरोग्य विभागाच्या विविध पथकांचा सहभाग

या बाल आरोग्य तपासणी शिबिरासाठी जामनेर आर.बी.एस.के. टीम २, ४ व ५ यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी डॉ. राजाराम देशमुख, डॉ. धनंजय पाटील, डॉ. चंद्रमणी सुरवाडे, डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. विजया पाटील, परमेश्वर भाऊ राठोड, प्रियंका वानखेडे, मोनाली सावळे आणि हर्षा गवळी यांच्यासह आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने विशेष सहकार्य केले. ग्रामीण भागातील कुपोषित व जोखमीच्या बालकांची वेळेत तपासणी करून त्यांना आवश्यक उपचारासाठी योग्य ठिकाणी संदर्भित करण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.



उपलब्ध-दिनेश प्रोव्ही, लोहारा.

6 प्रकारात उपलब्ध☝️

फक्त 50 रुपयात 110 ग्रॅम

प्रीमियम धूप कोन

Post a Comment

0 Comments