दिशा लाईव्ह न्यूज -:- शेंदुर्णी ता. जामनेर, जि. जळगाव येथील श्री त्रिविक्रमदेव संत कडोजी महाराज संस्थानच्या वतीने २८२ व्या वार्षिक श्रीविठ्ठल-रुक्मिणी रथोत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत कडोजी महाराज यांनी इसवी सन १७४४ मध्ये सुरू केलेल्या या ऐतिहासिक परंपरेचा मुख्य रथोत्सव सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे.
संस्थानचे ८ वे गादीवारस व वहिवाटदार ह.भ.प. शांताराम नारायण भगत आणि उत्तराधिकारी ह.भ.प. तुषार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली १९ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
उत्सवाची सविस्तर कार्यक्रम पत्रिका:
गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६: सायंकाळी ४ वाजता त्रिविक्रम मंदिरासमोर ह.भ.प. शांताराम महाराज भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरुवात होईल.
शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६: सकाळी ७ वाजता भक्त पुंडलिकाची मिरवणूक व डबी बसविणे, दुपारी २ ते ५ दरम्यान त्रिविक्रम मंदिरात संत कडोजी महाराज दिंडी सोहळा पार पडेल. सायंकाळी ५ वाजता संत कडोजी महाराज समाधीजवळ ध्वजारोहण व रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत नगर प्रदक्षिणा होईल.
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६: रात्री १० ते १२ या वेळेत त्रिविक्रम मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम आणि रात्री १२ वाजता तुलसी विवाह संपन्न होईल.
रविवार, २२ नोव्हेंबर २०२६: दुपारी ३ ते ५ दरम्यान दिंडी सोहळा व रात्री ८ ते ११ दरम्यान ग्रामस्थ, भजनी मंडळ, महिला मंडळी, चोपदार, डफवाले व मशालवाले यांच्या समवेत भव्य पालखी सोहळा निघेल.
सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ (मुख्य सोहळा): सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत भव्य रथोत्सव व पालखी सोहळा संपन्न होईल. या सोहळ्यासाठी स्थानिक व बाहेरील भजनी मंडळे, महिला मंडळे, तरुण मंडळे आणि असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६: दुपारी २ ते ६ दरम्यान दिंडी सोहळा पार पडेल, तर रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत संत कडोजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने संत कडोजी महाराज मंदिरात कीर्तनाचे आयोजन केले आहे.
बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६: सायंकाळी ५ वाजता त्रिविक्रम मंदिरात दहिकाला कार्यक्रम होईल.
शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६: रात्री ८ वाजता भक्त पुंडलिकाची मिरवणूक निघून रथघरामध्ये संत श्रेष्ठ कडोजी महाराज विठ्ठल-रुक्मिणी रथोत्सवाची सांगता होईल.
सर्व भाविकांनी या ऐतिहासिक रथोत्सवासाठी तन-मन-धनाने सहकार्य करावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. शांताराम महाराज भगत, ग्रामस्थ मंडळी व भजनी मंडळी शेंदुर्णी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments