Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सुरेल आवाजाची मोहिनी घालणारे गायक पी. गणेश यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!



दिशा लाईव्ह न्यूज -:--सुरांची जादू ज्यांच्या आवाजात, कलेचा अभिमान ज्यांच्या कर्तृत्वात आणि माणुसकीचा सुगंध ज्यांच्या स्वभावात आहे, असे मेणगाव (ता. जामनेर) येथील दिलदार व्यक्तिमत्त्व, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध गायक तथा आमचे स्नेही मित्र आदरणीय Singer P. Ganesh जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

संगीत ही केवळ कला नसून ती मनाला जोडणारी, भावनांना स्पर्श करणारी आणि माणसांच्या हृदयात घर करणारी एक सुंदर भाषा आहे. या भाषेवर आपल्या सुरेल आवाजाच्या माध्यमातून अधिराज्य गाजवणारे पी. गणेश यांनी आपल्या गायनकलेच्या जोरावर देश-विदेशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या आवाजातील गोडवा, गाण्यातील भावपूर्णता आणि सादरीकरणातील सहजता यामुळे त्यांनी असंख्य संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गायक किशोर कुमार आणि कुमार सानू यांना आदर्श मानून संगीत क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या पी. गणेश यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण संघर्षाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. अनेक अडचणींवर मात करत, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे त्यांचा आजवरचा प्रवास अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. खऱ्या अर्थाने संघर्षातून घडलेला हा एक अनमोल हिरा आहे.

सातासमुद्रापार पोहोचलेला आवाज; मात्र मनाने आजही आपल्या मातीशी घट्ट जोडलेला माणूस! हीच पी. गणेश यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवूनही त्यांच्या स्वभावातील साधेपणा, नम्रता आणि दिलदारपणा आजही कायम आहे. मेणगाव या आपल्या जन्मभूमीत आले की ते कोणताही मोठेपणाचा आव न आणता सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगतात. गावातील लहान-मोठ्या प्रत्येक व्यक्तीला भेटणे, आपुलकीने संवाद साधणे, जुन्या मित्रांची विचारपूस करणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे हा त्यांचा मूळ स्वभाव आहे.

प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही आपल्या माणसांना विसरायचे नाही, आपल्या गावाशी असलेली नाळ तुटू द्यायची नाही आणि माणुसकी जपायची, हा त्यांचा गुण खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या आवाजाची जादू जगभर पोहोचली असली, तरी त्यांच्या मनातील माणुसकीचा सूर अधिक भावणारा आहे.

अशा या हरहुन्नरी, दिलदार, मनमिळाऊ आणि संघर्षातून स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या कलाकाराला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या शुभेच्छा! आपल्या कलेचा सूर असाच जगभर घुमत राहो, आपल्या गायनाने रसिकांना कायम मंत्रमुग्ध करावे, यशाची नवनवीन शिखरे आपण सर करावीत आणि आपल्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी सदैव नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आदरणीय पी. गणेश जी!

शुभेच्छुक :

दिनेश चौधरी, लोहारा

दिशा लाईव्ह न्यूज परिवार

Post a Comment

0 Comments