दिशा लाईव्ह न्यूज :- : धुळे तालुक्यातील जामदे-मुकटी येथे कानुबाई सेवा फाउंडेशन व नंदनवन गोशाळेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त आयोजित सोहळ्यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत कानुबाई माता मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ना. पाटील यांनी संस्थेच्या गोसेवा, धार्मिक कार्य आणि सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून मंदिर उभारणीसाठी अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी सौ. अल्पाताई अग्रवाल, धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. लीलाताई चौधरी, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक नामदेवराव ढाके, लक्ष्य फाउंडेशनचे संस्थापक रोशन मराठे, संत गोसेवक रविदास महाराज (तरवाडे), मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक पितांबर भावसार, नवलसिंह पाटील तसेच जनसंग्रामच्या संपादिका विजया मानमोडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अकरा एकर जागेत साकारतोय धार्मिक व सामाजिक सेवाकार्याचा भव्य प्रकल्प
संस्थेचे संस्थापक किरण चौधरी व सौ. उज्वलाताई किरण चौधरी यांनी प्रदीर्घ काळातील परिश्रम, नियोजन आणि सामाजिक बांधिलकीतून तब्बल अकरा एकर जागेत कानुबाई माता मंदिर आणि नंदनवन गोशाळेचा भव्य प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे. धार्मिक श्रद्धा, गोसेवा, सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक परंपरा आणि मानवसेवा यांचा संगम या प्रकल्पाच्या माध्यमातून घडविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात मंदिर निर्माणकार्य, गोशाळेचा विस्तार, गोमातेचे संगोपन तसेच विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संस्थापक किरण चौधरी, सौ. उज्वलाताई चौधरी, अध्यक्ष किशोर अहिरे आणि चि. खुशाल चौधरी यांनी उपस्थित भाविक व मान्यवरांसमोर संस्थेच्या भविष्यातील नियोजनाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्ष किशोर अहिरे यांच्या नियोजनातून सोहळ्याचे आयोजन
या भव्य सोहळ्याच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष किशोर अहिरे व संस्थापक किरण चौधरी यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या महिनाभर आधीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध मंत्री, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून निमंत्रण देण्यात आले होते. नियोजनबद्ध तयारी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सोहळ्यास उपस्थिती लावली.
अध्यक्ष किशोर अहिरे यांनी प्रास्ताविकातून संस्थेची स्थापना, आजवरचा प्रवास, संस्थापकांचे योगदान, मंदिर व गोशाळेचे नियोजन आणि भविष्यातील संकल्प यांची सविस्तर माहिती दिली. आभार प्रदर्शन संस्थेचे कार्याध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक नामदेवराव ढाके यांनी केले.
हरिनाम कीर्तनाने परिसर भक्तिरसात चिंब
सोहळ्याचे आध्यात्मिक आकर्षण ठरलेल्या कीर्तन कार्यक्रमात सकाळी भोलाणे येथील ह.भ.प. सौ. राधालाई पाटील यांनी कीर्तनसेवा सादर केली. रात्री कान्हदेशातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. स्वप्नील महाराज गिरहकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
करणखेडा, अमळनेर येथील सुप्रसिद्ध गोपाल बँडचे मालक सुनील ग्रव, अनिल ग्रव व ग्रव बंधूंनी खानदेशातील आध्यात्मिक गीतांचे विशेष संगीतबद्ध सादरीकरण केले. दिवसभर गोमाता पूजन, विविध धार्मिक विधी, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
अकरा गुरव दांपत्यांसह एका मातंग दांपत्याचा सन्मान
या कार्यक्रमात खानदेशातील विविध देवस्थानांचे पुजारी तसेच कानुबाई माता व एकविरा माता यांचे निष्ठावंत सेवेकरी असलेल्या अकरा गुरव दांपत्यांचा आणि एका मातंग दांपत्याचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना भोजन महाप्रसादासह वस्त्रदान करून सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. ही विशेष सेवा संस्थापक किरण चौधरी, सौ. उज्वलाताई चौधरी व त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आली.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला माजी पालकमंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, पारोळा शेतकी संघाचे माजी अध्यक्ष चतुरभाऊसाहेब पाटील, सखारामनाना चौधरी, पारोळा नगरसेवक अमृत चौधरी, पारोळा भूषणचे संपादक भिका चौधरी, पारोळा तेली समाजाचे अध्यक्ष कैलास चौधरी, धर्मराज चौधरी, गोकुळ चौधरी, भाजपाचे तालुकाध्यक्ष कमलाकर पाटील, शिरीष तायडे, राकेश मराठे, हर्षल पाटील, सम्राट राजपूत, बाळासाहेब राजपूत, नितीन चौधरी, विक्की जगदाळे, शिरपूर येथील ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र येशी, भामपूरचे पोलीस पाटील संभाजी पाटील, जनकल्याण सेवाभावी संस्थेचे विकास सेन, सप्तशृंगी बहुउद्देशीय संस्था धुळेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. मीनाताई भोसले, संजय पाटील, गोसेवक मनोज चौधरी, निलेश चौधरी, ट्रस्टचे आधारवड व पुणे येथील उद्योजक पी. टी. चौधरी, सतीश चौधरी, प्रभाकर पाटील, नगराज चौधरी, किरण सूर्यवंशी (कासारे), समाजसेविका सौ. विजया मानमोडे, समाजसेविका सौ. देव्यानी पाटील, मुकटी येथील पंचायत समितीचे माजी सदस्य छोटूभाऊ चौधरी, उद्योजक उमेश नेते, हर्षल पाटील, संताजी पतपेढीचे चेअरमन सुभाषदादा चौधरी, गुलाब सौंदाने, शरद चौधरी, देवरे सर, ज्ञानेश्वर चौधरी, पृथ्वीराज पाटील, योगीराज पाटील, बबलू तात्या, एकनाथ महाराज, रोहिदास पाटील, इंदल धनगर, शिवाजी पाटील, पांडुरंग पाटील, अरुण पाटील, शरद गिरासे, किशोर पाटील, वसंत यादव, आंबोडे येथील राजू यादव, निलेश चौधरी, गणेश चौधरी, अवि चौधरी, रमेश चौधरी, संजय चौधरी आदी उपस्थित होते.
तसेच तामसवाडी येथील ह.भ.प. अनिल पाटील, अशोक भिका चौधरी, सुरेश चौधरी, संजय चौधरी, पंडित चौधरी, प्रभुदास चौधरी, विजय चौधरी, योगराज काटे-पाटील, कांतिलाल माळी, अनिल चित्ते, गणेश सुतार, विजय देसले, वेदांत पाटील, उमेश बोरसे, हर्षद प्रकाश गुरव, दिनेश गुरव, धुळे येथील एकविरा देवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव, हेमंत सूर्यवंशी, शशिकांत सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, भूषण सूर्यवंशी, कल्पेश सूर्यवंशी, शिरपूरचे प्रकाश गुरव, पुण्याचे विजय चौधरी, मोशीचे नंदू चौधरी, वारजे येथील ज्ञानेश्वर रामचंद्र चौधरी, पारोळा येथील देविदास चौधरी, अनिल चौधरी यांच्यासह कान्हदेश भजनी मंडळ, श्री गुरुदत्त भजनी मंडळ मुकटी, विघ्नहर्ता मित्र मंडळ मुकटी तसेच खानदेश आणि पंचक्रोशीतील असंख्य भाविक व मान्यवर उपस्थित होते.
यशस्वितेसाठी विशेष परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. कविता चौधरी, सौ. सारिका चौधरी, सौ. वैशाली चौधरी, सौ. ज्योती चौधरी, कु. जया चौधरी, नंदनवन गोशाळेचे अध्यक्ष खुशाल चौधरी व गोशाळा कार्यकारिणी समितीने विशेष परिश्रम घेतले. तसेच गुरुकृपा प्रिंटिंग प्रेस, पिंपरी-चिंचवड येथील नितीन, दीपक चौधरी, चैतन्य लिमकर, निलेश माळी आणि बबलू गोरखपूर यांनीही आयोजनासाठी सहकार्य केले.
नंदनवन गोशाळेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त झालेला हा सोहळा गोसेवा, धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि लोकसहभागातून उभ्या राहत असलेल्या सेवाकार्याचा परिचय करून देणारा ठरला.
संपादक--दिशा लाईव्ह न्यूज.
लोहारा, ता.पाचोरा.





Post a Comment
0 Comments