कापसाला योग्य भाव न मिळाल्यास आंदोलन करणार असे माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले
पाऊस वेळेवर पडला नसल्यामुळे कापूस उत्पादन 50% ने घटणार शेतकऱ्यांनी जो खर्च करायचा तो खर्च करून टाकला त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दिलीप वाघ यांची भेट घेऊन कापसाच्या भावा विषयी चर्चा केली शेतकऱ्यांवर प्रत्येक वर्षी असा अन्यायकारक शासक वर्ग वागत असल्याने कापसाला 7000 च्या वरती भाव नसल्यामुळे शेतकरीला परवडत नसून खर्च सुद्धा निघत नाही हा अन्यायकारक प्रकार असून सरकारने कापसाला योग्य भाव न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले काल दिनांक 12 नोव्हेंबर रविवार रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चेअरमन संजय नाना पाटील खलील देशमुख नितीन तावडे हर्षल पाटील अभिलाषा रोकडे प्राध्यापक भागवत मालपुरे प्रकाश पाटील भूषण वाघ एडवोकेट अविनाश सुतार सतीश चौधरी विजय पाटील रणजीत पाटील सुदर्शन सोनवणे आदी उपस्थित होते दिलीप वाघ यांनी स्पष्ट केले की पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावे दुष्काळग्रस्त भागाला फायदा मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे मंत्र्यासोबत चे जुने फोटो लावून आम्ही असे केले आम्ही तसे केले असे खोटे दाखवण्याचा प्रयत्न करून लोकप्रियता मिळवण्याच्या उद्योग करीत आहे चिड आणणारी बाब आहे चमकोगिरी करणाऱ्यांना खरंच दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसायचे असतील तर त्यांनी पाचोरा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक लाभ मिळवून द्यावा मग त्यांनी आपले श्रेय घ्यावे जनतेचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे ते प्रश्न कोणा मार्फत ही सुटले याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही पुढे बोलताना दिलीप वाघ म्हणाले राष्ट्रवादी गट शिवसेना ठाकरे गट भाजपाचे काही सुज्ञ पदाधिकारी मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात आपण त्यांचे श्रेय लाटू नये असे स्पष्ट शब्दात दिलीप वाघ यांनी सांगितले
ग्रामपंचायत चे निवडणुकाबाबत आपले मत व्यक्त करताना सांगितले की प्रत्येक गावागावात राजकारण बाजूला ठेवून लोक एकत्र येऊन गावाचा विकास साधतात त्यासाठी पक्ष पाहत नाही निवडून आल्यानंतर सगळे सदस्य प्रत्येक पक्षाच्या आमदाराकडे भेटीगाठी घेतात व आपल्या गावाचे प्रश्न मार्गी लावतात पाच महिन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाबाबत सांगितले की आमचे प्रश्न आम्ही कसे मार्गी लावतो चाळीसगाव ते जळगाव रस्ता दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकाच दिवशी अनेक ठिकाणी आंदोलने केली याची दखल संबंधित खात्याने घेऊन नऊ कोटींचा निधी मंजूर केले पावसाळ्यामुळे काम थांबले होते आता चाळीसगाव तालुक्यातून हिंगोणा या गावापासून कामाची दुरुस्तीची सुरुवात झाली आहे तसेच जळगाव कडूनही लवकर कामांची सुरुवात करावी ही मागणी आपण करणार आहे त्यामुळे होणारे अपघात टळतील असे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी सांगितले


Post a Comment
0 Comments