Type Here to Get Search Results !

राजस्थान फिरायला गेलेल्या अमळनेर तालुक्यातील पाच जणांचा अपघाती मृत्यू--साळुंखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर!!





अमळनेर प्रतिनिधी :- अमळनेर तालुक्यातील राजस्थान येथे फिरायला गेलेल्या सहा जणांचा राजस्थान मध्ये झालेल्या कार व कंटेंनेर च्या अपघातात पाच जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना 13 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे.

  या अपघात  माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक धनराज सोनवणे( वय 55) व त्यांची चार वर्षाची मुलगी,गायत्री योगेश साळुंखे वय 30 त्यांचा सात वर्षाचा मुलगा प्रशांत योगेश साळुंखे व एक वर्षाची मुलगी भाग्यलक्ष्मी योगेश साळुंखे असे पाच जण जागीच मयत झाले असून धनराज सोनवणे यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments