Type Here to Get Search Results !

लोहारा येथे आज पाटबंधारे विभाग,विजवितरण कंपनी आणि ग्रामपंचायत यांची सयुक्तिक पाणीचोरी करणाऱ्यांवर धडक कारवाई.

 दिशा लाईव्ह न्यूजच्या वृत्ताची संबंधितानी घेतली त्वरित दखल.


लोहारा :-: लोहारा-म्हसास रोडवर असलेल्या लघुपाटबंधारे अंतर्गत असलेल्या लोहारा धरणात अवैध पाणी उपसा करणाऱ्या लोकांवर आज दि.21 रोजी पाटबंधारे विभाग शाखा अभियंता श्री किशोर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वप्नील महाजन, विजवितरण कंपनीचे सहाय्याक अभियांता पाटील साहेब, तसेच लोहारा ग्रामपंचायत सरपंच अक्षय कुमार जैस्वाल,मच्छिमार सोसायटी अध्यक्ष मोहन भोई, यांच्या माध्यमातून धरणातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करण्यात आल्या आहे.

लोहारा या गावाला नेहमीच पाणीटंचाई सारखा प्रश्न दरवर्षी भेडसावत असतो..मागील 2 महिन्या पर्यंत लोहारा गावाला टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता.. या वर्षीही धरणात जेमतेम पाणी साठा शिल्लक आहे..त्यामुळे या वर्षीही पाणीटंचाई जाणवू नये  ,म्हणून ही कारवाई करण्यात आली, आणि यापुढेही अशीच कारवाई करण्यात येईल,जनतेने सहकार्य करावे.. तसेच कोणी धरणातील पाणीउपसा करतांना आढळल्यास त्वरित ग्रामपंचायतशी संपर्क साधावा..असे सरपंच अक्षय जैस्वाल यांनी सांगितले.

संयुक्तिक कारवाई वेळी सरपंच अक्षय जैस्वाल,ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, आबा चौधरी, अशोक क्षिरसागर, अमृत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गरबड चौधरी, पाटबंधारे खात्याचे मधुकर पाटील, रमेश कोळी,दिनकर गिते, विक्रम विठ्ठल चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, विशाल दौलत चौधरी, विनोद सुरेश कोळी,सागर समाधान कोळी, मयूर सुरेश मोरे,सागर संजय वाघमोडे, ग्रामपंचायत कर्मचारी अर्जुन पाटील,ज्ञानेश्वर सरोदे, रतन चव्हाण, विजवितरण कंपनीचे अशोक सुरवाडे, मनोज सोनार,अविनाश राठोड,गोपाळ पाटील व संपूर्ण स्टॉप तसेच गावातील अनेक मान्यवर हजर होते.

--------------------कारवाईचे स्वागत----------------------------

झालेल्या कारवाईचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे. आणि यापुढेही अशीच कडक कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा गावातील मान्यवरांनी बोलून दाखवली, तसेच कारवाई करतांना,पार्टी,पक्ष,लहान-मोठा न बघता प्रामाणिकपणे  कारवाई करत रहा-असे लोहारा वासीयांमध्ये बोलले जात आहे.

सदर धरणातून लोहार,म्हसास,रामेश्वर या गावांना पाणीपुरवठा केला जातो. परिसरात हेच एकमेव मोठे धरण आहे.या धरणावर जंगलातील अनेक वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. भौगोलिक दृष्ट्या हे धरण खूप महत्त्वाचे आहे.. या धरणातून जवळपास 20 हजार लोकांना पाणीपुरवठा केला जातो. पिण्याचे पाणी महत्वाचे आहे..नागरिकांनी सहकार्य करावे.कोणीही धरणातून पाणीउपसा करू नये---ग्रामस्थ.



Post a Comment

0 Comments