Type Here to Get Search Results !

दुभाजकावर गाडी आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात गुजरात राज्यातील दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी ,-पारोळा येथील घटना

 


पारोळा (प्रतिनधी) भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त आलेल्या तिघांनी आपले काम आटोपून कारने परतीचा प्रवास सुरु केला. गुजरातकडे जाताना तालुक्यातील सार्वे गावाजवळ कार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात गुजरात राज्यातील दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे घटना २१ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.

भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त गुजरात राज्यातील बडोदा येथील कार चालक अजय नरेंद्र कोकजे (वय ६२), तसेच आनंद जिल्ह्यातील अकलाव तालुक्यातील भानपुरा येथील चेतन ताखासिंग राज (वय २७) व तखासिंग उदयसिंग राज (वय ६०) हे आपल्या खासगी आर्टीगा कार (जीजे २३, सीई- ३६११) ने २० रोजी आले होते. कंपनीचे काम संपवून ते तिघे २१ रोजी पहाटे परतीच्या प्रवासाला निघाले. पारोळा तालुक्यातील सार्वे गावानजीक नॅशनल हायवे क्रमांक सहावरुन पहाटे ३ वाजेच्या सुमारास जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने आर्टिका कार भरधाव वेगाने रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर जोरदार आदळली. यात चालक अजय नरेंद्र कोकजे व चेतन ताखासिंग राज यांचा जागीच मृत्यू झाला, तर तखासिंग उदयसिंग राज हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments