जामनेर तालुक्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर विचार विनिमय करून पुढील दिशा ठरविणयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) आज दिनांक २४/०१/२०२४ बुधवार रोजी दुपारी १ वाजता शेंदुर्णी सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटी आवारात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते यांनी संजय गरूड यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेवर आपले विचार मांडले .काहींनी संजय गरूड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडू नये तसेच अन्य पक्षात प्रवेश करू नये अश्या भावना व्यक्त करतानाच संजय दादा गरूड यांनी कोणताही निर्णय घेतला तरी त्यांचे समर्थन करण्याचे संकेत दिले. तर बहुसंख्य कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठींबा दिला आहे.
या वेळी संजयदादा गरुड म्हणाले की,जामनेर तालुक्यातील ९० हजार मतदारांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांनी माझ्यावर ३ वेळा भरभरून विश्वास दाखवला त्यांच्या हिताचा व भावनांचा विचार करून २ दिवसात पक्ष प्रवेशाचा निर्णय घेणार आहे त्याविषयी सर्वांना कळवणार आहे व सर्व माझ्या निर्णयाचे समर्थन करतील अशी अपेक्षा संजय दादा गरूड यांनी व्यक्त केली आहे.



Post a Comment
0 Comments