दिशा लाईव्ह न्यूज -:- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या “करिअर कट्टा”या उपक्रमांतर्गत प्रतिपंढरपूर असणाऱ्या शेंदूर्णी, ता.जामनेर येथील अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड .कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील प्राध्यापिका सौ.डॉ. योगिता चौधरी यांना “आधुनिक सावित्री पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला होता.
क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर पुरस्कार जाहीर करण्यांत आला होता. सदर पुरस्कार हा आप्पासहेब पवार सभागृह बारामती येथे प्रदान करण्यांत आला.
प्राध्यापक म्हणून काम करीत असतांना केलेले शैक्षणिक कार्य, कीर्तनकार म्हणून केलेले अध्यात्मिक कार्य, विद्यार्थ्यांच्या सार्वांगिण विकासासाठी विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमधील सहभाग व प्राप्त यश आणि सेवा कालावधीत केलेले संशोधनाचे कार्य ,यासाठी सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्ली येथील प्रशासकीय अधिकारी श्रीमती रेखा रायकर कुमार(आयएएस) (Indian Civil Accounts Service (ICAS) | Member (Finance) at Land Port Authority of India, Ministry of Home Affairs at Government of India ) यांच्या हस्ते प्रदान करण्यांत आला.
प्रसंगी श्री. यशवंत शितोळे, अध्यक्ष – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, आणि महाराष्ट्र राज्यातील प्राचार्य प्रवर्तक, विभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक, महाविद्यालय समन्वयक करिअर संसदेचे विद्यार्थी उपस्थित होते.
सदर पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.संजयदादा गरुड, सचिव श्री.सागरमलजी जैन, सहसचिव श्री. यू यू दादा पाटील, वसतिगृह सचिव श्री. दीपक गरुड भाऊसाहेब, प्राचार्य प्रा. संजय भोळे, उप प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments