दिशा लाईव्ह न्यूज -:-- लोहारा ता. पाचोरा येथिल लोकसंख्या सुमारे १५ ते १७ हजार आहे .लोहारा गावामध्ये एकमेव सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेची प्रमुख शाखा असल्याने सुमारे १ वर्षा पूर्वी बँकेमध्ये संपूर्ण १ रुपया पासूनचा आर्थिक व्यवहार पैसे भरणे व काढणे होत होता.
परंतु आता १ वर्षा पासून वीस हजार रुपयापर्यंतचे पैसे भरणे किंवा काढणेलोहारा येथील सेंट्रल बँकेत बँकेने बंद केल्यामुळे, लोहारा येथिल बँकेचे खातेदार यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे.
गावामध्ये व परिसरात् सुमारे ९० ते ९५% शेतकरी व मजूर वर्ग असल्याने त्यांचा आर्थिक व्यवहार २० हजाराच्या वर जात नसल्यामुळे या लोकांची गावामध्ये आपण दुसरे पैसे काढण्याची व टाकण्याची मुबलक व्यवस्था नसल्याने ,तसेच बऱ्याच ग्राहकांकडे ATM व इतर फोन पे व इत्तर सुविधा नसल्याने आपल्या बँकेचे खातेदार यांची गैर सोय होत आहे .
त्यासाठी पुढील प्रमाणे व्यवस्था झाल्यास सेंट्रल बँकेचे खातेदार यांचे आर्थिक फसवणुक किंवा लुबाडणूक होणार नाही.
यासाठी पुढील व्यवस्था करण्यात यावी ती पुढील प्रमाणे.
१) लोहारा गावामध्ये कमीत कमी ४ बैंक ग्राहक सेवा केंद्र आपल्या बँकेचे असावे सुरु करण्यात यावे.
२) सदर केंद्र ज्यांना देण्यात येईल त्यांना बँक आर्थिक मोबदला देत असेल, तर तिथे आपल्या बँकेचे बोर्ड लाऊन २४ तास सेवा किंवा नियमोचीत सेवा उपलब्ध आहे म्हणुन सूचना लिहण्यास भाग पाडावे.
३) आपण सुरु केलेले बँक ग्राहक सुविधा केंद्र वर आर्थिक सुविधा देण्यासाठी विना शुल्काचा फलक लावण्यात यावा.
४) सदर बैंक सेवा केंद्र चालकाला आपल्या कडून मोबदला मिळत असल्यास त्याने खातेदाराकडून कुठलेही शुल्क घेऊ नये, म्हणून तशी अट केंद्र देण्यापूर्वी त्यांच्या कडून लेखी घेण्यात यावी.
वरीलप्रमाणे लोहारा येथील सुविधा २० हजारापर्यंतचे सर्व आर्थिक व्यवहार नविन नेमण्यात येणाऱ्या ग्राहक सेवा केंद्र होई पावेतो बँकेत करण्यात यावे .
यापूर्वी आपल्या बँकेमध्ये त्यांच्याकडे १ वर्षापूर्वी आर्थिक कामकाज ज्याप्रमाणे सुरु होते त्याप्रमाणे पुर्वरत करण्यात यावे.अशा आशयाचे निवेदन लोहारा येथील सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी दि.8 जानेवारी रोजी वरिष्ठांना दिले आहे.तसेच वरील निवेदन त्यांनी मा. वरिष्ठ व्यवस्थापक सो. सेन्ट्रल बँक इंडिया मुख्यालय जळगाव. यांनाही दिले आहे. मात्र अद्याप पर्यंत त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे दिसत असल्याने ग्रामस्थांना आश्चर्य वाटत आहे.
आता सेंट्रल बँकेचे वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात,याकडे लोहारा गावासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
Post a Comment
0 Comments