Type Here to Get Search Results !

बस अभावी पहूर परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासामुळे पालक वर्ग संतापला ज्यादा बस सुरू करण्याची मागणी! संबंधित मागणीकडे अधिकारी लक्ष देतील काय?


 दिशा लाईव्ह न्यूज -:-  शंकर भामेरे, पहूर, ता.जामनेर - पहूर सह परिसरातील सुमारे हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणासाठी जामनेर येथे जात असतात त्यात सकाळी 7:45  ते 8:45 दरम्यान बस नसल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी तब्बल एक तास बस नसल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींचे हाल होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे

.तसेच महाविद्यालय, शाळा सुटल्यानंतर सायंकाळी एकच बस आहे.त्यातही प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते आपला जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.सकाळी 7:45 ते 8:45 दरम्यान एक जादा बस व सायंकाळी विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी एक जादा बस सोडावी अशी मागणी संतापलेल्या पालकांनी केली आहे.



    पहूर सह परिसरातील  अंदाजे 20 ते 25 गावातील 1100 विद्यार्थी व विद्यार्थिनी जामनेर येथे शिक्षणासाठी जातात.सकाळी 7:45 ते 8:45 दरम्यान बस नसल्याने सकाळी एक जादा बस सोडावी  तसेच सायंकाळी महाविद्यालय तसेच शाळा सुटल्यानंतर साडेपाच वाजता भुसावळ ते पिंपळगाव हरेश्वर, तसेच शेंदुर्णी बस आहे. यामध्ये जामनेर येथे तालुक्याच्या गावी आलेले ग्रामस्थ प्रवासी सायंकाळी आपापल्या गावी परततात तसेच याचवेळी पहूर  परिसरातून शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर आप आपल्या गावी जाण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी होते.


यानंतर आपल्या गावी पोहोचण्यासाठी रात्रीच बस असते ती विद्यार्थिनींसाठी सोयीची नसते दरम्यान दोन्ही बस मध्ये गर्दी होत असल्याने बस मध्ये पाय ठेवायला ही जागा राहत नाही. परिणामी  विद्यार्थिनींचे खूपच हाल होतात. विद्यार्थी- विद्यार्थिनी दाटीवाटी करून आपला जीव मुठीत हेऊन जीवघेणा प्रवास करतात . 

दरम्यान साधारण दोन महिन्यापूर्वी बस मध्ये गर्दी असल्याने गेटमध्ये उभे असलेल्या विद्यार्थी  दणका लागल्याने गेट उघडल्या जाऊन खाली पडल्याने जखमी झाला होता. 

यापुढे अशी घटना घडू नये व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या जीवास धोका होऊ नये यासाठी पहूर सह परिसरातील पालकांनी एसटी महामंडळ प्रशासनाविषयी संतप्त भावना व्यक्त करीत एस टी महामंडळाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करून संतप्त भावना व्यक्त केली आहे.

       तरी पहूर व परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे हाल होऊ नये यासाठी जामनेर आगाराने विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ज्यादा बस त्वरित सुरू करावे अशी मागणी पालकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थी, विद्यार्थिनीसह पालकांनी केला आहे.



Post a Comment

0 Comments