दिशा लाईव्ह न्यूज -:- (गजानन क्षिरसागर ) लोहारा तालुका पाचोरा येथील श्रीमती दमवताबाई वाचनालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविण्यासाठी १ ते १५ जानेवारी वाचन पंधरवडा राबविण्यात आला.
जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अश्या सुर्वे वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन आणि सामुहिक वाचन व स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे लोहारा शाखेचे व्यवस्थापक,आणि प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व असणारे माननीय ऋषिकेशजी सरगर यांच्या हस्ते करण्यात आले.
वाचन स्पर्धेमध्ये दोन गट करण्यात आले होते .यामध्ये इयत्ता सहावी या गटातून कुमारी स्वामिनी दीपक कासार तिने प्रथम क्रमांक, कुमारी वैभवी सुपडू माळी द्वितीय, कुमारी चैताली विनोद पाटील तृतीय,
तर इयत्ता सातवी या गटातून कुमारी समृद्धी सागर कासार प्रथम, कुमारी दीप्ती नवल माळी द्वितीय, कुमारी श्रावणी योगेश दिवसाने तृतीय, या स्पर्धेतील विजेत्यांना वही,पेन ,कंपास ,पेटी ,प्याड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
परीक्षक म्हणून उपशिक्षक श्री एस एम सिसोदे, श्री पि.यू खरे यांनी काम पाहिले.
या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात व्यवस्थापक ऋषिकेशजी सरगर यांनी सांगितले की," वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राज्यातील वाचनसंस्कृतीला बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. अलीकडच्या काळात तरुण वर्ग हा वाचन संकृतीपासून दुरावत चाललेला आहे. त्यामुळे तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. या उपक्रमामुळे तरुण पिढीमध्ये ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होईल ."
तसेच जे जी पंडित माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक पी.यू.खरे यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या आहारी न जाता ग्रंथाचे वाचन करावे. ग्रंथच आपल्या जीवनाला आकार देतात. आपल्या व्यक्तिमत्व विकासाला प्रेरणा देण्याचे काम ग्रंथ करीत असतात.
या प्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेचे व्यवस्थापक ऋषिकेशजी सरगर साहेब,हेड कलार्क राऊत साहेब, सुर्वे वाचनालयाचे अध्यक्ष बापूसो विनायक पाटील, ज्येष्ठ नागरिक रामचंद्र काळे, पंडित माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक शिसोदे सर, माणुसकी ग्रुपचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार गजानन क्षीरसागर, रामदास भोलाणे,आणि विद्यार्थी, पालक वर्ग व गावातील वाचक उपस्थित होते.
कार्यक्रमाची रूपरेषा ग्रंथपाल श्रीराम कलाल यांनी मांडली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुर्वे वाचनालयाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी केले.
दिशा लाईव्ह न्यूज.
सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट बातम्या फक्त....
दिशा लाईव्ह न्यूज.
9881028027 9309918930
Post a Comment
0 Comments