Type Here to Get Search Results !

कुऱ्हाड येथे बसस्टँड परिसरातील अतिक्रमणावर हातोडा!!! 62 वर्षांनंतर प्रथमच बसस्टँड परिसराने घेतला मोकळा श्वास!! नागरिकांनी केले कारवाईचे स्वागत!


कुऱ्हाड प्रतिनिधी -:-सुनील लोहार.

 दिशा लाईव्ह न्यूज -:-  महाराष्ट्रात ग्रामपंचायतच्या 1 मे 2962 च्ये स्थापनेनंतर कुऱ्हाड ग्रामपंचायत मार्फत प्रथमच  बस स्टँड परिसरातील अतिक्रमण काढून रहदारी मोकळी करण्यात आली.



 या परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता. कुऱ्हाड व परिसरातील अनेक विद्यार्थी पाचोरा येथे उच्च शिक्षणासाठी तसेच महिला व पुरुष  तसेच वृद्ध मंडळी आपल्या नियमित कामासाठी पाचोरा, लोहारा, जळगाव येथे दररोज  प्रवास करीत असतात. या ठिकाणी शालेय विद्यार्थी व प्रवाशांना उभे राहण्यास जागा देखील नव्हती  .बस  आल्यास ती दूरवर उभी राहत प्रवासी बसमध्ये चढ उतार करीत होते.परत या ठिकाणी  वाहतुकीस नेहमी अडथळा होत असल्या कारणाने प्रथमच कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायत मार्फत   पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यात आले.



संबंधित लोकांना  अतिक्रमन संदर्भात  ग्रामपंचायतीने  वेळोवेळी लेखी व तोंडी नोटीस देऊन देखील सामोपचाराने हा प्रश्न सुटला नाही, अखेर पिंपळगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस बंदोबस्त घेऊन आज मंगळवार सकाळ पासून हे अतिक्रमण काढण्यात आले. तसेच सायंकाळी उशिरा पर्यंत मुस्लिम मोहल्ला परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी  ही मोहीम सुरूच होती.


अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या 13 सदस्यांचे पाठबळ लाभले. या कामी ग्रामविकास अधिकारी रमेश महाजन ,सरपंच सौ कविता प्रदीप दिनकर महाजन, उपसरपंच कौतिक पाटील,ग्रामपंचायत सदस्य अशोक देशमुख, जमील कहाकर, रमेश मुके समाधान पाटील, इमरान काहकर, अशोक बोरसे, अरुण बोरसे ,जगदीश तेली, सुधाकर महाजन मा.सरपंच संतोष चौधरी व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.



अतिक्रमण काढण्यासाठी पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, पीएसआय सर्जेराव क्षीरसागर ,प्रकाश पाटील ,सहायक पोलिस उपनिरीक्षक अरविंद मोरे,अमोल पाटील,नामदेव इंगळे,शैलेश चव्हाण,अतुल पवार, प्रमोद वाडिले,सह इतर पोलीस बांधवांनी  चोख बंदोबस्त ठेवला.



Post a Comment

0 Comments