Type Here to Get Search Results !

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलिसांची दमदार कामगिरी; बैलचोरी प्रकरणातील चोरट्यांनी अटक.चोरीचा तपास लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा! अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता. कारसह सव्वालाखांचा मुद्देमाल जप्त!! दिशा लाईव्ह न्यूजची दखल.


                           (हीच ती बैलजोडी)

 

दिशा लाईव्ह न्यूज -:-   गेल्या अनेक दिवसांपासून फत्तेपुर आणि परिसरात चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत दिशा लाईव्ह न्यूजने दि.13 रोजी या घटनेसंदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.लागलूच सर्व स्टॉपने कंबर कसून अतिशय परिश्रम करून या बैलजोडी चोरीचा तपास लावून चोरट्यांनी अटक केली आहे.याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 फत्तेपुर परिसरात गुरे चोरीप्रकरणी पोलीसांचा तपास सुरु असतांना तिघांना पोलीसांनी अटक केलेली आहे.  यातील दोघांना ३ दिवसांची तर एकाला २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. पोलिसांनी संशयित आरोपींकडून गुरे चोरी प्रकरणात चारचाकी वाहन ६५ हजार रुपये किमतीची व ६० हजार रुपये रोख असा १ लाख २५ हजार रुपये जप्त केलेले आहेत.


फत्तेपूर येथील शेतकरी  दिलीप पंडीत चौधरी यांची बैलजोडी गोद्री रस्त्यांवरील खळ्यातून १३ जानेवारी च्या रात्री चोरी झालेली होती. याच रात्री देऊळगांव गुजरी येथून मधूकर दगड्डु सनेसर यांची बैलजोडी चोरी झालेली होती. घटनेचा तपास सुरु होण्याअगोदर गोद्री येथून पुन्हा बैलजोडी चोरी झाली. दि. २२ जानेवारी येथील पोकों मुकेश पाटील व दिलीप पाटील हे पोलीस वाहनातून देऊळगांव गुजरी परिसरात रात्रीची गस्त घालत असतांना  त्यांना एक चारचाकी वाहनावर संशय आला. वाहनाला थांबवून वाहनातील दोघांची चौकशी केली केली असता त्यांची नावे शेख मुजम्मिल शेख रफीक कुरेशी (वय-३०, रा. माळीखेल कुरेशी वाडा जळगांव जामोद जि. बुलढाणा) व रहिम शहा रहेमान शहा (वय-४४, रा. पिंपळगांव काळे ह.मु. ब-हाण पूर रोड ताजनगर जळगांव जामोद जि. बुलढाणा) अशी असून दोघ संशयित आरोपीनी गुरे चोरल्याची कबूली दिली आहे.


यातील दोघांना जामनेर न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर दि.२३ रोजी पळून गेलेली चारचाकी वाहन क्र.एम एच-२८ बी बी ५२७८ या वाहनांचा मालक शकील खान बुढन खान (वय-३४, रा. ईदगांव प्लॉट शेगांव जि. बुलढाणा) यास शेगांव येथून अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तिघांविरुद्ध अगोदर गुन्हा दाखल होता. या प्रकरणी पोलीसांनी आरोपीकडून चारचाकी वाहन किंमत ६५ हजार रुपये व ६० हजार रुपये रोख असे १ लाख २५ हजार रुपयांचा माल जप्त केलेला आहे.

तरी त्वरित चोरट्यांकडून मिळालेली रक्कम त्वरित शेतकरी बांधवांना देण्यात यावी. अशी मागणी ही होत आहे.



Post a Comment

0 Comments