दिशा लाईव्ह न्यूज -:- (प्राध्यापक-योगिता चौधरी, शेंदूर्णी )
महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियाना अंतर्गत अप्पासाहेब रघुनाथराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एक दिवसीय स्वच्छता कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.
महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी "स्वच्छता राखून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्याची काळजी घेणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. "या स्वरूपाच मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्ष वाणिज्य विभागातील डॉ. सुजाता पाटील यांनी सांगितले.
तर "विद्यार्थिनींनी मासिक पाळीच्या वेळेला अधिक लक्ष स्वच्छतेकडे दिले पाहिजे. त्यांनी या काळात घ्यावयाची काळजी स्वतःसाठी या काळात विशेष वेळ काढावा, " या स्वरूपाचे प्रा.वर्षा लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयीन विद्यार्थिनींना ज्याप्रमाणे शारीरिक स्वच्छतेची गरज आहे. त्याच पद्धतीने मानसिक स्वच्छतेची ही आवश्यकता आहे. असे प्रतिपादन प्रा छाया पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ .योगिता चौधरी यांनी केले. प्रास्ताविकात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी महाविद्यालयाला ऋतुमती अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजनाची संधी दिली त्याबद्दल विद्यापीठाचे आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती गुजर या विद्यार्थिनींनी केले. सदर कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या रक्त चाचण्या करून आलेले अहवाल विद्यार्थिनींना वाटण्यात आले. या चाचण्यांमध्ये ज्या विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन कमी प्रमाणात आढळले अशा विद्यार्थिनींना विशेष काळजी घेण्यासाठीचे उपाय सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Post a Comment
0 Comments