दिशा लाईव्ह न्यूज ,शंकर भामेरे--पहूर , ता . जामनेर ( ता . २ )
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुत्र्याचा फडशा पडल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली .
पहूर कसबे येथील शेतकरी पंडित शहादु घोंगडे यांच्या एकूलती शिवारातील शेतात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला .
शेतकरी आणि मजूर शेतात सकाळी आले असता त्यांना कुत्र्याचा मृतदेह आढळून आला . आजूबाजूला निरीक्षण केले असता तेथे मातीत बिबट्याचे ठसे आढळून आले . बिबट्याच्या संचाराने पहूर , एकूलती शिवारातील शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .
या संदर्भात जामनेर वनविभागाचे प्रशांत पाटील यांनी दिशा लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले की , "शेतकरी बांधवांनी रात्रीच्या सुमारास शेतात एकटे जाऊ नये . लहान मुलांना शेत शिवारात एकटे सोडू नये . "
Post a Comment
0 Comments