Type Here to Get Search Results !

माजी पंचायत समिती सभापतीचा प्रताप वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराचा हिसकावला मोबाईल ! उडवा -उडवीची उत्तरे देत सत्य दडपणाचा केला प्रयत्न !



दिशा लाईव्ह न्यूज ,शंकर भामेरे  पहूर , ता . जामनेर ( ता . २ ) जामनेर तालुक्यातील पहुर - कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी वाघूर नदीच्या काठी  २५ - १५ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या  ४५ लाखांच्या सार्वजनिक सभामंडपाच्या  उभारणी संदर्भात दिशा लाईव्ह न्यूजचे पहूर येथील प्रतिनिधी  वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारास तेथे उपस्थित असलेल्या माजी पंचायत समिती सभापती तथा जय सप्तशृंगी मॉ निवासिनी ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव  घोंगडे यांनी कामाविषयी उडवा -उडवीची उत्तरे देऊन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला .  वृत्त संकलनासाठी गेलेल्या आदर्श व युवा  पत्रकार ,, द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा सहसचिव शंकर रंगनाथ भामेरे यांचा मोबाईल फोन हिसकावून घेत व्हिडिओ शूटिंग बंद केली . 



        माजी सभापतींनी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा केलेला प्रयत्न निंदनीय असून  याप्रकरणी  पत्रकार शंकर भामेरे यांनी   पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना  लेखी निवेदन दिले आहे .


दिशा लाईव्ह न्यूज सत्य तेच वृत्त प्रकाशित करतात. असल्या कोनाच्याही दबावाला  आम्ही भीक घालत नाही./घालणार नाही.गेल्या 28 वर्षापासून अखंडितपणे आमची  स्वाभिमानी पत्रकरिता चालू आहे./राहणार. 28 वर्षात अनेक आव्हाने आम्ही स्वीकारली आहे.

तूर्त इतकेच.......जनतेचे लक्ष मात्र दिशा लाईव्ह न्यूजच्या पुढील वृत्ताकडे.....

संपादक -:- दिनेश चौधरी, लोहारा.

दिशा लाईव्ह न्यूज



Post a Comment

0 Comments