Type Here to Get Search Results !

धक्कादायक!!!-- कोटीचे मालक, प्रसिध्द साहित्यीक श्रीनाथ खंडेलवाल यांचा वृध्दाश्रमात मृत्यू. ८० कोटीचे मालक, प्रसिध्द साहित्यीक श्रीनाथ खंडेलवाल यांचा वृध्दाश्रमात मृत्यू


दिशा लाईव्ह न्यूज  :- प्रसिध्द साहित्यीक श्रीनाथ खंडेलवाल यांनी वृध्दाश्रमामध्ये वयाच्या ८० व्या वर्षी शनिवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यविधीला त्यांच्या कुटूंबियातील कुणीही सदस्य उपस्थित राहीला नाही.त्यांचा मोठा मुलगा व्यावसायिक आहे आणि मुलगी विधीतज्ञ आहे. खंडेलवाल यांना २ मुले १ मुलगी आहे. मुलगी ही सर्वोच न्यायालयात वकील आहे. खंडेलवाल यांच्याकडे कोट्यावधी रूपयाची मालमत्ता आहे. त्यांनी जवळपास ४० पुस्तके लिहीलेली आहेत आणि अनुवादीतही केली आहेत.



२०२३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या पार्थीवावर देणगी गोळा करून अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या नांवावर असलेली कोट्यावधी रूपये किंमतीची मालमत्ता त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. ते आजारी पडल्यानंतर त्यांना मुलांनी वाऱ्यावर सोडून दिले होते.

खंडेलवाल सुमारे १० महिने वृध्दाश्रमात राहीले. तेथे त्यांना मोफत सेवा देण्यात आली.मात्र या १० वर्षांच्या कालावधीत त्यांना भेटायला त्यांच्या मुलांपैकी कोणीही आले नाही असे सांगितले जात आहे.

Post a Comment

0 Comments