दिशा लाईव्ह न्यूज-- शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . ३ ) शिक्षकांनो , नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्वतःच्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठी सज्ज व्हा , आपल्या विद्यार्थ्यांमधील विविध क्षमता वाढीस लागण्यासाठी कटीबद्ध व्हा !असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा . डॉ .चंद्रकांत साळुंखे यांनी केले . राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्स उपक्रम आणि सर्व शिक्षा अभियान यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या जिल्हास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .
जी . एच .रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान ५दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून जिल्हाभरातून सुमारे २२५ शिक्षक सहभागी झाले आहेत .
काल सोमवारपासून सुरू झालेल्या प्रशिक्षणाचे प्रस्ताविक अधिव्याख्याता प्रा . डॉ .जगन्नाथ दरंदले यांनी केले . यावेळी जी . एच . रायसोनी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा .संजय शेखावत यांनी मार्गदर्शन केले . प्रा . अनिल सोनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . प्रा . गणेश सूर्यवंशी यांनी आभार मानले
यावेळी सुलभक प्रा .भरत शिरसाठ , डॉ . जगदिश पाटील डॉ . सी . वाय . पाटील यांच्यासह प्रशिक्षणार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रशिक्षणातील महत्त्वाचे मुद्दे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
क्षमताधारीख मूल्यांकन
क्षमताधिष्टीत प्रश्न निर्मिती कौशल्ये
नवी आव्हाने पेरणारे शिक्षण
भारतीय ज्ञान प्रणाली
व्यावसायिक शिक्षण
समग्र प्रगती पत्रक
शिकवण्यापेक्षा शिकण्याला प्राधान्य!
Post a Comment
0 Comments