Type Here to Get Search Results !

नाचणखेडा ,ता.जामनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीकांत चौधरीची बिनविरोध निवड!!


दिशा लाईव्ह न्यूज - शंकर भामेरे, -:-  पहूर,ता.जामनेर)नाचणखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या  उपसरपंच पदी श्रीकांत ज्ञानेश्वर चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.मावळते उपसरपंच शबिनामो आबेद पटेल  यांनी आवर्तन पध्दतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मंगळवारी रोजी दुपारी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच  सुनंदा धर्मराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती.


यावेळी उपसरपंच पदासाठी श्रीकांत चौधरी  यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.त्याना सूचक म्हणून शबिनामो पटेल यांनी सही केली. यावेळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच शबिनामो पटेल, सदस्य ज्योती कैलास चौधरी , सुनंदा महेंद्र पाटील,सुरेखा गजानन मोरे ,अरुण पाटील, नितीन बाविस्कर,इकबाल देशमुख,तसेच पॅनल प्रमुख       हर्षल चौधरी,ज्येष्ठ नेते आबेद कादर पटेल, संदीप चौधरी ,  महेंद्र पाटील,दीपक पाटील, युवराज पवार,ग्राम विकास अधिकारी अजय बी.वंजारी आदी उपस्थित होते

नवनियुक्त उपसरपंच श्रीकांत चौधरी यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments