दिशा लाईव्ह न्यूज-कृष्णा पाटील-तोरणाळे----:::---दिवसेंदिवस जमिनीचे होणारे विभाजन वाढती तुकडेकरी त्यातुन शेतरस्त्यांचा निर्माण होत चाललेला गंभीर प्रश्न यासंदर्भात रावेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासुन शेतकरी राहिवासी असून तहसिल कार्यालयावर नेहमी हेलपाट्या मारत असत संबधित शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांनी राज्यात सुरु झालेल्या शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने तालुक्यांमध्ये शिव पाणंद शेतरस्ते खुले करण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी पुढाकार घेत शेतरस्त्याच्या शेवटच्या व्यक्तीला मोठा संघर्ष करावा लागत आहे.
याचा गांभिर्याने विचार करत शेवटच्या शेतकऱ्यांना दर्जेदार शेतरस्ता मिळून देण्यासाठी व शेतकऱ्यांचा शेतरस्त्यांचा संघर्ष संपवण्याचा एकजुटीने निर्णय तहसिल कार्यालयावर मोर्चा काढत घोषणाबाजी करून आंदोलन केले.
रावेर येथील तहसिलदरांनी विषयाला गांभीर्याने घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवरस्ता,शेतपाणंदरस्ता,बांधरस्ता यांसह तहसिलकार्यालयात चालु शेतरस्ता प्रलंबित केसेस आदी विविध विषयांवर सखोल चर्चा करत उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करणे कामी,अधिकृत कार्यवाही करणेबाबत नियोजन करत प्राधान्याने गावांना जोडणारे शिवरस्ते खुले करणे तसेच सर्व प्रशासकीय तालुका रस्तासमिती सदस्य व शिव पानंद शेतरस्ता समितीची प्रत्येक महिन्याला बैठक घेवून येणाऱ्या प्रत्येक शेतरस्त्याच्या अर्जदाराला शेतरस्ता देन्याचे आश्वासन दिले .
यावेळी परिसरातील बहु संख्येने शेतकरी उपस्थित होते..त्यावेळी रावेर तालुक्यातीत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील,यांच्या चळवळीच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून यामुळे रस्त्यांच्या असलेल्या अडचणी दुर होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे समजते..
Post a Comment
0 Comments