Type Here to Get Search Results !

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम . विठ्ठल मंदिराच्या नावाखाली सप्तशृंगी देवीचा सभामंडप भाविकांसह प्रशासनाची दिशाभूल !!



दिशा लाईव्ह न्यूज --शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . ९ ) अस्तित्वात नसलेल्या जय सप्तशृंगी निवासीनी मातेच्या मंदिरासमोर  शासनाच्या २५ - १५ योजनेतून  सुमारे ४५ लाखांच्या सभामंडपाचे बांधकाम सुरू असून  प्राचीन मंदिरांना विकासाच्या योजनांपासून  डावलल्या जात असल्याचा प्रकार  समोर आला आहे .

          वाघुर नदीच्या काठी पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारा जवळ ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २४२ वर ८० बाय ३० आकारात  भव्य सभा मंडप उभारला जात आहे . सदर सभामंडप चक्क अस्तित्वात नसलेल्या परंतु ' क ' वर्ग  दर्जा प्राप्त जय सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट समोर होत आहे . 


विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल राऊत आणि जय सप्तशृंगी मा ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे या दोघांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे . माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे भाविकांची आणि प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचे समोर येत असून शासनाच्या निधीचा गैरवापर होत आहे .  पहूर कसब्यातील

महादेव मंदिर , हनुमान मंदिर विठ्ठल मंदिर ही तीन्ही मंदिरे अस्तित्वात असताना त्यांच्यासमोर सभा मंडप होत नसून अस्तित्वातच नसलेल्या जय सप्तशृंगी मातेच्या 'क ' वर्ग दर्जाप्राप्त  मंदिरासमोर कसा होत आहे ? असा संतप्त सवाल भाविकांमधून विचारला जात आहे .

 याप्रकरणी संबंधीत  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त भाविकांसह नागरिकांनी केली आहे . याच बांधकामा संदर्भात वृत्त संकलन करण्यासाठी केलेल्या पत्रकार शंकर भामेरे यांचा माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे यांनी मोबाईल हिसकावून घेतल्याची घटना घडली होती . याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे . 


" पहूर कसबे येथे विठ्ठल मंदिर असून येथे कोणतेही बांधकाम सध्या सुरू नाही  . " 

      हभप विठ्ठल राऊत 

अध्यक्ष , श्री समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्ट , पहूर कसबे .

********************************************


" पर्यटन विभागातर्फे विठ्ठल मंदिरासाठी बांधकाम सुरू आहे .

आम्ही गावाचा विकास करत आहोत . चार प्रश्न कोणी विचारू नये . "

बाबुराव घोंगडे

अध्यक्ष , जय सप्तशृंगी माता निवासिनी ट्रस्ट पहूर - कसबे .

----------------------------------------------------------------------------

" सदर सभामंडपाचे काम 

ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २४२  वर होत आहे. 

शंकर जाधव ,

माजी सरपंच , ग्रामपंचायत पहूर - कसबे

::::::;;:::::::::::::::::::;;;;;;;:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::;


सत्य तेच-----फक्त दिशा लाईव्ह न्यूज मध्ये.

Post a Comment

0 Comments