Type Here to Get Search Results !

देवदर्शनाला जाताना होत्याचं नव्हतं झालं, भरधाव मोटरसायकलच्या गाडीत पदर अडकला अन् भयंकर घडलं!! लागोपाठ दुसरी घटना



दिशा लाईव्ह न्यूज  : अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे इथं एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी अंत झाला आहे.संबंधित महिला दुचाकीने अकोल्यातील दोनद येथील देवीच्या दर्शनाला जात होत्या. देवीच्या दर्शनाला पोहचण्याआधीच दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे.

पल्लवी नवलकर असं मृत पावलेल्या 25 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. त्या अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथील रहिवासी आहेत. घटनेच्या दिवशी त्या दुचाकीने दहिगाव गावंडे येथून दोनद येथील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. भरधाव वेगानं दुचाकीवरून जात असताना त्यांच्यासोबत अनर्थ घडला. त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकून त्या रस्त्यावर पडल्या.

दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन पल्लवी यांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे. 25 वर्षांच्या विवाहित महिलेचा अशाप्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने दहिगाव गावंडे गावात शोककळा पसरली आहे.


मुलाच्या डोळ्यादेखत आईनं सोडला प्राण!!


पहूर ,ता.जामनेर येथील रहिवाशीई  असलेल्या मनीषा चौधरी यांचाही मृत्यू असाच झाला होता.

मागील आठवड्यात असाच अपघात छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता. सिल्लोड फुलंब्री रस्त्यावरून जात असताना एका महिलेचा दुचाकीच्या चाकात पदर अडकून मृत्यू झाला होता. घटनेच्या दिवशी मनिषा चौधरी आपला मुलगा ऋषीकेश याच्यासह संभाजीनगरला कामानिमित्त गेले होते. तेथील काम उरकल्यानंतर ते दोघंही दुचाकीने पुन्हा आपल्या गावी चिंचखेडा इथं येत होते. फुलंब्री- सिल्लोड रस्त्यावरून जात असताना चिंचखेडा गावाजवळच त्यांचा अपघात झाला. दुचाकीच्या मागच्या चाकात मनीषा यांचा पदर अडकला आणि त्या रस्त्यावर जोरात पडल्या. हा अपघात इतका भयंकर होता, की त्यांचा मुलाच्या डोळ्यादेखत जागीच मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments