Type Here to Get Search Results !

मित्रानेच केला घात-मित्राने मित्रावर पाठीमागून वार करीत , रोख रकमेसह पोबारा करणाऱ्या धाडसी चोरीचा पिंपळगाव हरे. पोलिसांकडून उलगडा!!


दिशा लाईव्ह न्यूज ,कुऱ्हाड प्रतिनिधी -:-सुनील लोहार.

एकाच कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या  मित्राने दुचाकीवर  जात असताना मानेवर चाकू लाऊन जखमी   करीत  54000रू.किमतीचा रोख रकमेसह दिनांक 17 जानेवारी रोजी पोबारा केला .


ही घटना  लोहारा- बांबरुड रस्त्यावर विद्युत वितरण कंपनी लोहारा सब स्टेशन जवळ  दुपारी घडली होती. या घटने संदर्भात पिंपळगाव हरे.पोलीस स्टेशन ला जखमी फिर्यादी  अजय वासुदेव बोधडे राहणार वसाडी तालुका नांदुरा ह . मु.एरंडोल या तरुणाने धाव घेत त्यावर बितलेली आपबिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना सांगितली. पोलीस स्टेशन मार्फत या घटनेचे चक्र फिरवीत सदर  फरार असलेला आरोपी रोहित चौधरी रा. कळमसरा यास सात दिवसांनी कळमसरा या गावातून ताब्यात घेत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


पिंपळगांव हरे पोलिस स्टेशन ला यासंदर्भात गु र न 08/2025 भारतीय न्याय सहिंता कलम 309(6) प्रमाणे गुन्हा दि 18/01रोजी दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील आरोपी रोहित सुधाकर चौधरी,वय 23 वर्ष र कळमसरा ता पाचोरा जि जळगाव हा गुन्हा घडल्या पासून फरार होता, 


आरोपी हा काल कलमसरा गावात आलेला असल्याची सपोनी प्रकाश काळे यांना माहिती मिळाल्या वरून सफौ 2623 अरविंद मोरे, पोहेका 1833 शैलेश चव्हान ,पोका 2410 प्रमोद वडीले अशांनी दी 05/02 रोजी कळमसरा गावातून  त्यास त्याब्यात घेत,सबंधित गुन्ह्यात अटक करून त्याची पोलिस कस्टडी रिमांड घेऊन त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक चाकू,70000 रू की ची बजाज पल्सर मोटर सायकल  व आरोपीने फिर्यादी याचे कडून हिस्कावलेले 30000 रू रोख असे जप्त केले आहे. 

सदर गुन्हा उघडकीस आणणे कमी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर चाळीसगाव उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे पाचोरा भाग यांचे मार्गदर्शनाने सपोनी प्रकाश काळे,पो उप निरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, सफौ 2623 अरविंद मोरे ,पोहेका 1833 शैलेश चव्हान, पोका 2410  प्रमोद वडीले, पोहेका 1489 अतुल पवार पोना 141 दीपक अहिरे ,पोका 2410 प्रमोद वाडीले, पोका 152 योगेश   भिलखेडे यांनी मदत केली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहायक फौजदार अरविंद मोरे करीत आहे.



Post a Comment

0 Comments