दिशा लाईव्ह न्यूज, शंकर भामेरे--पहूर , ता . जामनेर ( ता . ८ ) परिसरात चोरीच्या घटना थांबात नसल्याने येथील शेतकरी बांधव जळगाव - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पहुर येथील वाघूर नदी पात्रावरील पुलाजवळ दिनांक १८/२/२०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
पहुर येथील शेतकरी बांधव यांनी जिल्हाधिकारी साहेब जळगाव, अप्पर जिल्हाधिकारी साहेब जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब जळगाव, पहुर पोलीस स्टेशनला, पहुर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले असून त्या निवेदनात म्हटले आहेत की, आम्ही सह्या करणारे शेतकरी बांधव पहुर आणि पंचक्रोशीतील रहिवासी असून आमच्या शेतशिवारातील विज पंपाच्या केबल वायर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चोरीस जाण्याच्या घटना घडत आहेत चोरीचा मुद्देमाल सापडुन सुध्दा पोलीस मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. संबंधित चोरांचा बंदोबस्त होत नसल्याने आम्ही आता लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहेत असे निवेदनात म्हटले आहे.
या प्रसंगी जामनेर पंचायत समिती माजी सभापती बाबुराव घोंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन लहासे, माजी सरपंच शंकर जाधव, उपसरपंच राजु जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती वासुदेव घोंगडे, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे, विष्णू घोंगडे, पुंडलिक भडांगे, भरत घोंगडे, जगदीश घोंगडे, देवेंद्र घोंगडे, चेतन रोकडे, अर्जुन पवार, माधव धनगर , जिवन कचरे, मधुकर बनकर,सुधाकर जाधव, रविंद्र बनकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होत
शेतकऱ्यांनी घेतली अरविंद देशमुख यांची भेट
पहुर - ना. गिरीष महाजन यांचे समर्थक व जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली व पहुर येथे चोरीच्या घटना थांबात नाही आहेत चोरीच्या घटना थांबायला पाहिजेत तसेच पहुर कसबे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दोन वेळेस पहुर पोलीस स्टेशनला नवीन पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करा असा ठराव करण्यात आला आहेत मात्र अजूनही पहुर पोलीस स्टेशनला नवीन पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही आहेत असं शेतकरी बांधवांनी सांगितलं. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक श्री . देशमुख यांनी शेतकऱ्यांना चार ते पाच दिवसांत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
Post a Comment
0 Comments