दिशा लाईव्ह न्यूज--शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . १६ ) जामनेर तालुक्यातील पहूर येथे शेंदुर्णी मार्गावर देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून संगीतमय शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे .
श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर हे जागृत देवस्थान असून पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे . सप्ताहाचे यंदाचे २० वे वर्ष असून ह भ प उखाजी महाराज खराटे मुक्ताईनगर यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय शिव महापुराण कथा पारायण होणार आहे .
सौ प्रमिला सुरेश राऊत यांच्यातर्फे संगीतमय शिव महापुराण कथेची सेवा आयोजित केली आहे .
२२ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता संगीतमय शिव महापुराण कथेस प्रारंभ होणार आहे . १ मार्चपर्यंत सप्ताहाचे आयोजन असून ह भ प पंढरीनाथ महाराज कोऱ्हाळा बाजार , ह भ प शांताराम महाराज शेंदुर्णी , ह भ प अश्विनीताई महाराज पहूर , ह भ प बाबुराव महाराज पहूर , ह भ प विष्णुदास महाराज चिंचखेडे , ह भ प ज्ञानेश्वर महाराज चिंचखेडा , ह भ प फकीरा महाराज जामनेर यांचे दररोज रात्री हरि कीर्तन होणार आहेत . ह भ प रमेश महाराज लोंढरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
_महाशिवरात्री यात्रोत्सव -_
सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात बुधवार दि .२६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या शुभ- पर्वावर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भव्य यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे .
यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थांनासह पंचक्रोशीतील भाविकांचे सहकार्य लाभत आहे . सर्व धार्मिक कार्यक्रमांचा परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज , उपाध्यक्ष प्रदीप लोढा , सचिव हरिभाऊ राऊत यांच्यासह सर्व विश्वस्त , ग्रामस्थ , भाविकांनी केले आहे .
Post a Comment
0 Comments