दिशा लाईव्ह न्यूज--कृष्णा पाटील ,तोरणाळे ता. जामनेर : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या देऊळगाव गुजरी शाखेच्या अध्यक्षपदी संजय पुंजाजी काळे, उपाध्यक्षपदी चिमण सुलेमान तडवी व नरसिंग पाटील तोरणाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
ही कार्यकारिणी २०२५ या एक वर्षाची आहे. नुकत्याच झालेल्या साप्ताहिक बैठकीत ही निवड करण्यात आली.
बैठकीला निरीक्षक म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चौधरी, जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बो-हाडे उपस्थित होते.
शाखेचे कार्याध्यक्ष संजय जटाळे यांनी प्रास्ताविक तर जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बो-हाडे यांनी सघटना उभारणीबाबत माहिती दिली असून सभासद नोंदणीबाबत आढावा घेण्यात आला.
समितीच्या विधायक कार्याला पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्य ठेवले पाहिजे असे सांगून निरीक्षक रवींद्र चौधरी यांनी आळंदी येथे झालेल्या समितीच्या ३५ वर्षपूर्ती अधिवेशनाची माहिती दिली. यानंतर एकमताने २०२५ या वर्षाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
शाखेच्या अध्यक्षपदी संजय पुंजाजी काळे, तर उपाध्यक्षपदी चिमण सुलेमान तडवी व नरसिंग सरदारसिंग पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच महत्वाच्या कार्यकारी पदांसाठी २० जणांची निवड करण्यात आली आहे या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच व गावातील प्रतिष्ठीत नागरिक हजर होते.
Post a Comment
0 Comments