Type Here to Get Search Results !

गांधी रिसर्च फांडडेशन आयोजित ''गांधी विचार संस्कार ''परीक्षेत श्रीमती अक्कासो प्रभावती गजानराव गरुड माध्यामिक विद्यालयाचे यश '


दिशा लाईव्ह न्यूज --::- '' गांधी रिसर्च फाउंडेशन जळगांव '' आयोजित गांधी विचार संस्कार परिक्षेचा निकाल घोषित झाला असून श्रीमती अक्कासो प्रभावती गजानराव गरुड माध्यमिक विद्यालय बेटावद बु ॥ ता जामनेर विद्यालयाच्या इयत्ता १०वी ची विद्यार्थीनी कु. योगेश्री गजानन शेळके हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे .


या विजेत्या विद्यार्थीनीचे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड,  सचिव काकासो सागरमलजी जैन,   सहसचिव दादासो यु यु पाटील , कार्यालयीन सचिव भाऊसो दिपक जी गरुड, वस्तीगृहसचिव ग. गो. सूर्यवंशी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस आर निकम विदयालयातील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील व परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन पर कौतूक होत आहे . 


सदर परिक्षेला विद्यालयातून एकूण 46 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता . या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा उतीर्ण झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले . सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवून पदक मिळविण्याची परंपरा विद्यालयाने सुरू ठेवलेली आहे .या सर्व विद्यार्थ्यानां मार्गदर्शन शाळेचे उपशिक्षक ए. बी . चौधरी यांनी केले आहे .



Post a Comment

0 Comments