Type Here to Get Search Results !

लग्नाच्या आमिषाने वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या फरार आरोपीस पिंपळगाव पोलिसांनी केली अटक.



कुऱ्हाड प्रतिनिधी -:-सुनील लोहार .

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथून जवळच असलेल्या कुर्हाड  गावातील आकाश शांताराम ठाकरे या तरुणाचे  गावातीलच समाजाच्या मुलीशी प्रेमप्रकरण होते,तो तिला वारंवार लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करीत होता,

परंतु काही दिवसांनी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याने या तरुणीस  लग्न करण्यास नकार दिला असता ,तरुणीची  फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता तिच्या नातेवाईकांनी पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली.पोलिसांनी गु .र.नंबर 297/2024 भा.न्या.स. कलम 69 प्रमाणे सबंधित तरूनांविरूध गुन्हा दाखल करण्यात आला. 


सदर गुन्ह्याचा तपास चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर ,पोलीस कर्मचारी  अमोल पाटील,राहुल बेहरे,इमरान पठाण यांनी सुमारे दीड महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस अटक केली.

 आरोपीस पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहे.


संपादक-:- दिशा लाइव्ह न्यूज.

Post a Comment

0 Comments