दिशा लाईव्ह न्यूज -:- प्रतिभावत मुख्यधयापक ,लोहारा येथील मा. मुखध्यापक आदरणीय कै .वामन सिताराम पाटील (W.S.Patil ) सर नांद्रा. प्र लो . यांचे आज दि.11.2.2025 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यानअल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांची अंतयात्रा आजच त्यांच्या राहत्या गावी नांद्रा येथून संध्याकाळी पाच वाजता निघणार आहे .
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली ,एक मुलगा असा परिवार आहे.
-ते हरीष वामण पाटील जि. प .शिक्षक माळप्रिप्री यांचे वडील होत.
माझा भाऊ गेला......
शेंदूर्णी संस्थेचे सहसचिव व मा.मुख्यध्यापक श्री यु यु पाटील सर म्हणाले की, माझा सख्या भाऊ शांत झाला आहे. असं व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!!
**********************************************
राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील ध्रुवतारा डब्ल्यू एस पाटील सर यांचे दुःखद निधन
अतिशय आदर्श असे व्यक्तिमत्व ज्यांचे नाव घेताच साने गुरुजींची आठवण होते अतिशय शुद्ध चारित्र्य आणि मातृ हृदयी असणारे सर शेवटच्या क्षणापर्यंत समाजासाठी आणि उच्च नैतिक मूल्यांसाठी जीवन जगले शिक्षणाबरोबरच पर्यावरण हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेत काम करत असताना सर्व शाळा त्यांनी पर्यावरण पूरक बनवल्या स्वतः झाड लावणं आणि ते जगवण्याचे काम सरांनी लीलया करून दाखवलं शाळेतील विद्यार्थ्यांना देवाचं स्वरूप मानणाऱ्या सरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच प्रेम आधार आणि नवीन जीवन जगण्याची प्रेरणा दिली आज त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या अधिकारी पदांवर कार्यरत आहेत शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेसाठी एक समर्पित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होते
समाजासाठी अतिशय तळमळ असलेलं हे एक सामाजिक नेतृत्व आज आपल्यात नाही त्यांच्या जाण्याने फार मोठी सामाजिक पोकळी निर्माण झालेली आहे मला आठवतं 2007 आठ मध्ये मराठा समाजाच्या सामूहिक विवाह साठी सरांनी अपार कष्ट घेतले स्वतःच्या मोटरसायकलने तालुक्यात फिरून समाजातील लोकांनी पोकळ प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन कर्जबाजारी न होता सामूहिक विवाह करावे अशी त्यांची तळमळ होती ती तळमळ मी बघितली माझ्यासहित गावातील आणखी दोन अशा तीन तरुणांचे लग्न सामूहिक विवाहात करून घेण्याचे ठरवले त्यांनी तयार केलेले चार जोडपे आणि माझ्यासहित तयार झालेले तीन जोडपे अशा सात जोडप्यांचे सामूहिक विवाह सरांच्या मेहनतीने तळमळीने तालुक्यात प्रथमच झाले समाजावर अतिशय मातृवत प्रेम करणारं आणि समाजाच्या जडणघडणीत चांगला विचारांचे पेरणी करणारे नेतृत्व आज आपल्यात नाही ही तीव्र वेदना देणारी घटना आहे सर आपल्यात नसले तरी सरांच्या कर्तुत्वाचा सुगंध हा नेहमीच दरवळत राहणार आहे अतिशय अष्टपैलू असे हे व्यक्तिमत्व अनेक क्षेत्रात सरांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटवली पाणी आडवा पाणी जिरवा आणि शेती समृद्ध करा हा त्यांचा ध्यास होता त्यांच्या प्रयत्नातून नांद्रा गाव हे पाणीदार गाव होण्यास मदत झाली
सामाजिक दारिद्र्याचे कारण हे व्यसन आहेत तेव्हा व्यसनमुक्ती झाली पाहिजे म्हणून त्या क्षेत्रामध्ये सुद्धा दादांनी भरीव कामगिरी केली अनेक तरुणांच्या समुपदेशन करून त्यांना योग्य मार्गावर लावण्याचे काम दादांनी केलं वय झालेलं असलं तरी तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने सर नेहमीच कार्यरत असायचे
सरांच्या निधनाने फार मोठे सामाजिक नुकसान झालेले आहे आपण एका सामाजिक मौल्यवान हिरा गमवला आहे परंतु तुम्ही आपण सर्वजण नियतीपुढे नतमस्तक आहोत तायडे परिवार नांद्रा यांच्या दुःखात शेंदुर्णी एज्युकेशन संस्था व संस्थेचे चेअरमन सन्माननीय दादासाहेब संजयराव भास्करराव गरुड व सर्व शेंदुर्णी एज्युकेशन परिवार सहभागी आहे परमेश्वर सरांच्या आत्म्यास चिरशांती देवो त्यांना स्वर्गप्राप्ती मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना आणि अश्रू पूर्ण श्रद्धांजली🙏💐
🙏 शोकाकुल🙏
डॉक्टर -:- बाजीराव पाटील
( चैतन्य प्रतिष्ठान )
Post a Comment
0 Comments