Type Here to Get Search Results !

वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्रात संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी. जयंतीनिमित्त महिला शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन!!


 दिशा लाईव्ह न्यूज--- -:-   जामनेर तालुक्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी  येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने थोर संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात सर्जन डॉ.समाधान वाघ उपस्थित होते. 

डॉ. समाधान वाघ यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. 

जयंतीनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात 20 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तर 30 महिलांवर लॅपस्कोपीक  कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील महाजन तर आभार अनंत गांगतिरे यांनी मानले.

              कार्यक्रम प्रसंगी उपस्थित.

 वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील,डॉ.गोपाळ वाणी, सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक व्ही.एच.माळी, आरोग्य सहाय्यक 

विक्रम सिंग राजपूत, औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनीषा वाकोडे, आरोग्य सहाय्यिका सुरेखा गोसावी,शोभा घाटे,आरोग्य सेवक सुनील बोरसे, अनंत गंगातिरे,विनोदपाटील,स्वप्निल महाजन, अनिल सोनवणे, धीरज पाटील,हेमंत पाटील,मनोज परदेशी,आरोग्य सेविका मालती चौधरी,चित्रा बिलगे, दुर्गा जाधव,कविता पांढरे, कनिष्ठ सहाय्यक अनिता सुरवाडे,परीचर फुलवंती रबडे ,चालक जावेद तडवी, वाकडी येथील पत्रकार श्री ज्ञानेश्वर घुगे तसेच आशा सेविका आणि  नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments