दिशा लाईव्ह न्यूज-शंकर भामेरे,पहूर , ता . जामनेर ( ता . १३) एकविसाव्या शतकातील नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता वृद्धिंगत करणे शिक्षकांचे कर्तव्य असून त्यासाठी शिक्षकांनीही स्वतःच्या विविध क्षमतांचा विकास करायला हवा , असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ . अनिल झोपे यांनी केले . ते इंदिराबाई ललवाणी विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या भेटी प्रसंगी शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते .
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था , पुणे महाराष्ट्र व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने जामनेर येथे इंदिराबाई ललवाणी विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे . तालुकाभरातून सुमारे ४००शिक्षक पहिल्या टप्प्यात सहभागी झाले आहेत .
प्रशिक्षणा दरम्यान सुलभक म्हणून पंकज रानोटकर , रणजीत जगताप , मंगला जवळेकर , डॉ . रत्नाकर सुतार , गणेश राऊत , शरद वासनकर , पंडित बावस्कर , राहुल महाजन , चंदू राजपूत , नितीन सैतवाल , ईब्राहिम शेख , शंकर भामेरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे .
प्रशिक्षणातील मुद्दे -
राष्ट्रीय शिक्षण धोरण ,
क्षमताधारित मूल्यांकन ,
क्षमताधारीत प्रश्न निर्मिती ,
समग्र प्रगती पत्रक ,
आनंददायी शिक्षण ,
प्रत्येक मूल शिकू शकते ,
सहध्यायी मूल्यमापन ,
मातृभाषेतून शिक्षण ,
बालवाटिकांची निर्मिती
Post a Comment
0 Comments