Type Here to Get Search Results !

कुऱ्हाड येथे उद्यापासून सती माता व महादेव मंदिर जीर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठा सोहळा!! तेली चौधरी समाजातर्फे तीन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


कुऱ्हाड प्रतिनिधी -:- सुनील लोहार.

कुऱ्हाड खुर्द येथे उद्या दिनांक 15 ,16 व 17 फेब्रुवारी पर्यंत तेली चौधरी समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत .नव्यानेच बांधण्यात आलेल्या सती माता मूर्ती  तसेच महादेव शिवलिंग  मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.


यात शनिवारी  सकाळी आठ वाजता सती माता मिरवणूक ,राहत्या घरापासून ते मंदिरापर्यंत निघणार आहे. तसेच अकरा वाजता पुण्यवाचन, यज्ञदेवता, देवी सती माता  मूर्तीचे संस्कार, स्त्रपण विधी, जलदिवास अग्नि स्थापन.

 तसेच रविवारी सकाळी आठ वाजता स्थापित देवतांचे पूजन, धाण्यादि वास, पुष्पधी वास, नवग्रह हवन यज्ञदेवता हवन,  तसेच सोमवार 17 रोजी सकाळी मंदिर वास्तुशांती ,कलशारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठा, बलिदान, पूर्णाहूती तसेच सायंकाळी महा आरती होईल. या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा कुऱ्हाड खुर्द येथे संपन्न होणार आहे.

  वरील सर्व धार्मिक विधी कार्यक्रम हे श्री विनायक शास्त्री जोशी भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.तरी  या  तीन दिवसीय कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन  येथील( तेली) चौधरी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments