Type Here to Get Search Results !

"जंगला लावुनीया माचीस काडी आपणच उध्वस्त करतोय आपली पुढचीपिढी" "थोडी दक्षता घेऊया संवर्धनाला आपला हातभार लावूया वनवा टाळूया पाण्याचे संवर्धन करूया!!"



दिशा लाईव्ह न्यूज -कृष्णा पाटील,तोरणाळे जामनेर- तालुक्यातील शेवगा पिंप्री हे जामनेर वनविभागा अंतर्गत येत असून जामनेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांच्या मार्गदर्शना खाली जि.परिषद शाळा  शेवगा- पिंप्री येथे वनवा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. 


कार्क्रमा प्रसंगी फत्तेपूर वनपाल राज कुमार ठाकरे यांनी वणव्या पासून कोण कोणत्या प्रकारे हानी होते. वणवा लागल्या ने जंगलातील प्राणी, पक्षी,छोटी मोठी पिल्ले, वनस्पतीझाडे  गुरां ढोरांना लागणारे चारा ,जंगलातील लहान मोठे झाडे. नष्ट झाल्याने आपल्याला लागणार पाऊस फार महत्वाचा असल्याने  तो कमी होऊन पर्यावरनावर सुद्धा परिणाम होतो.

जंगलातील वनवा लागण्याची करणे. मोह फुल, डिंक, ई.वानोपज गोळा करण्या करिता, जनावरांना लुसलुशीत गवत मिळण्या करीता अवैध - शिकारीसाठी शेतातील पाला पाचोळा निष्काळजी पणे जाळणे पेटवत ठेवणे धूम्रपान करणे इत्यादी पासून वनवा लागू नये याची दक्षता प्रत्येक नागरिकांनी घ्यावी.. 


 वनवा लावने हा दंडनीय अपराध असून.. वनवणवा लावल्यास  शिक्षा होईल..   वनवणवा वीजवण्यासाठी नागरिकांनी मदत करणे हे कायदेशीर कर्तव्य आहे..

 वनवा लावताना आढळल्यास वन अधिनियम 1927 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच गुन्हेगाराची माहिती द्या आणि 10 हजार रु.मिळवा वनवा लागल्यास आपण 1926 या टोल फ्री क्रमांकावर  माहिती देऊ  शकता.


 ही सेवा 24 तास उपलब्ध असते .तसेच वनवणवा जनजागृती माहितीचे पोस्टर  लावून तोरणाळे जुनोना,शेवगा,पिंप्री कापूस वाडी, पळासखेडा काकर,चिंचोली या  ठिकाणी  त्यांनी माहिती सांगितली कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित वनरक्षक  अतुल पाटील पळासखेडा बीट, वनरक्षक  संदीप पाटील नांद्रा हवेली बीट, वनरक्षक संदीप पाटील जुनोना बीट, वनरक्षक संदीप चौधरी तसेच जि.परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग , विद्यार्थी,तसेच गावातील महिला व पुरुष   हजर व उपस्थित होते..





Post a Comment

0 Comments