Type Here to Get Search Results !

शेंदूर्णी येथील गरुड महाविद्यालयात पार पडला शपथविधी समारोह

  


 दिशा लाईव्ह न्यूज --::--- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा आणि अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 जुलै 2025 रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करियर संसदेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये उत्साहात पार पडला.

करिअर कट्टा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांच्या नियोजनामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असावा, विद्यार्थ्यांना नियोजन, संघटन, समन्वय,मार्गदर्शन करण्याची सवय व्हावी, अर्थातच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यात नेतृत्व क्षमता वृद्धिंगत व्हावी यासाठी या महाविद्यालयीन करिअर संसदेची स्थापना करिअर कट्टा उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रभरातील महाविद्यालयात प्रत्येक वर्षी करण्यात येते.


गरुड महाविद्यालयातही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.श्याम साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली , या शपतीचे महत्त्व विद्यार्थी दशेत किती आहे हे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी IQAC समन्वयक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ.दिनेश पाटील  यांनी विद्यार्थ्यांना करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या विविध संधी यावर प्रकाशझोत टाकला.


सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक करिअर कट्ट्याच्या महाविद्यालयीन समन्वयक डॉ.योगिता चौधरी यांनी केले.

सूत्रसंचालन विद्यार्थिनी जागृती गुजर हिने केले. तर आभार विद्यार्थिनी भूमिका जोशी हिने मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी  करिअर संसद जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या साक्षी चौधरी उपस्थित होत्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये शपथ घेतली.

या करियर संसदेचे पदाधिकारी भूमिका मंगेश जोशी - मुख्यमंत्री.मानसी गजानन चौधरी- कायदे व शिस्तपालन मंत्री, जयश्री अमृत भारुडे- संसदीय कामकाज मंत्री, लोचना श्रीकृष्ण चौधरी- महिला व बालकल्याण मंत्री, योगेश्वरी समाधान वाघ- नियोजन मंत्री, साक्षी फकीरा गुजर- सामान्य प्रशासन मंत्री, तेजस विश्वनाथ लोहार -माहिती व प्रसारण मंत्री, लोकेश अनिल चौधरी- उद्योजकता विकास मंत्री, वृषाली शांताराम पाटील- रोजगार स्वयंरोजगार मंत्री, हर्षदा योगेश तेली - कौशल्य विकास मंत्री, कोमल संदीप मस्के - सदस्य, दीपक भोई -सदस्य या सर्व सदस्यांनी आपापल्या पदासाठी शपथ घेतली.

सदर कार्यक्रमासाठी प्रा.प्रशांत देशमुख डॉ.सुजाता पाटील प्रा.रीना पाटील, डॉ.वसंत पतंगे, डॉ.अजिनाथ जीवरग प्रा.वर्षा लोखंडे, प्रा.छाया पाटील, प्रा.शुभांगी चौधरी प्रा.अश्विनी बारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments