Type Here to Get Search Results !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पहूर येथील आदर्श शिक्षक शंकर भामेरे यांचा गौरव.




 दिशा लाईव्ह न्यूज -:- पहूर, ता. जामनेर –

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, पहूर येथील उपक्रमशील व जिज्ञासू वृत्तीचे शिक्षक शंकर रंगनाथ भामेरे यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.


शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक भान ठेवत त्यांनी अंधश्रद्धा विरोधी चळवळीमध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत समितीच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, विस्ताराधिकारी संजय पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रा. सुशीला मुंडे (मुंबई), मच्छिंद्र मुंडे तसेच समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची बीजे रोवली जात असून समाजात प्रबोधनाची चळवळ बळकट होत आहे.

Post a Comment

0 Comments