Type Here to Get Search Results !

पहूर,ता.जामनेर येथे २२०० कुटुंबीयांना मंत्री महाजनांच्या हस्ते भांडे वाटप .



दिशा लाईव्ह न्यूज --::-- पहूर ता जामनेर 

पहूर येथे सुमारे २२०० कुटुंबीयांना घरगुती वापरातील भांड्यांचे संच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते वाटप करण्यात आले .

   महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे बांधकाम कामगार महिला पुरुषांसाठी मोफत गृह उपयोगी साहित्य संच वाटप कार्यक्रम आज रविवारी महात्मा फुले माळी समाज मंगल कार्यालयात दुपारी आयोजित करण्यात आला .


पहूर परिसरातील मोठ्या संख्येने महिला पुरुष कामगार यावेळी उपस्थित होते .

      मंत्री महाजन यावेळी पुढे बोलताना म्हणाले की ,  प्रत्येक नागरिकाला घर , मागेल त्याला गॅस , विज आणि प्रत्येक घरी शौचालय ही शासनाची भूमिका आहे . गोरगरीब नागरिकांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र व राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत आहे .

       याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या  स्थानिक पदाधिकाऱ्यांसह तालुकाभरातून नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते .  यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .



Post a Comment

0 Comments