दिशा लाईव्ह न्यूज (बाळू जोशी ) ,वाकडी.ता.जामनेर.दि.०६/०७/०२५ वाकडी येथून जवळच असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले तुळसाबाई येथे असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर मध्ये दर वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाकडी, शहापूर,कासाली, फत्तेपूर,मांडवे,चिंचखेडा, शेंगोळे, तळेगाव,कर्णफाटा, या ठिकाणावरून अनेक दिंड्या येतात,आणि अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात,
टाळ मृदंगाच्या गजरातमध्ये पायी दिंड्या येतात, अनेक लहान मुले विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा करतांना दिसतात, तुळसाबाई मंदिरासमोर किर्तनाचे आयोजन करण्यात येते, बाहेर गावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फराळाचे आयोजन करण्यात येते, हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
Post a Comment
0 Comments