Type Here to Get Search Results !

किसनराव पाटील यांच्या कर्तृत्वाचा सुगंध आजही दरवळतोय - प्रा . डॉ . माणिकराव पाटील पहूर येथे ' शोधूया भूमिपुत्राच्या पाऊल खुणा ' कार्यक्रम



दिशा लाईव्ह न्यूज -:-  पहूर ता जामनेर

स्वातंत्र्योत्तर काळात पहुर मध्ये माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्वर्गीय किसनराव ठमाजी पाटील यांच्या कार्याचा सुगंध आजही दरवळतो आहे , असे प्रतिपादन प्रा . डॉ .माणिकराव पाटील यांनी केले . ते पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर .टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वर्गीय किसनराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते .


    पहूर गृप एज्युकेशन सोसायटी संचलित पहूर, आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पहूर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  किसनराव ठमाजी पाटील यांचा  ३३ वा स्मृतिदिन  शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला .संस्थेचे उपाध्यक्ष साहेबराव देशमुख अध्यक्षस्थानी होते .



पुढे ते म्हणाले की , परिवर्तनाची  सुरुवात स्वतः पासून करावी , विद्यार्थ्यांनी अभ्यास करून स्वतः सह  शाळेचा  लौकिक वाढवावा .  

       प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय किसनराव पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले . यावेळी निवृत्त माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे ,  मुख्याध्यापक आर . बी .पाटील , रामेश्वर पाटील , विजय बोरसे यांनी कृतज्ञ भावना व्यक्त केल्या.

ज्येष्ठ संचालक कडूबा पाटील , ॲड . एस . आर . पाटील , संस्था प्रतिनिधी किशोर पाटील ,  अरुण घोलप , व्ही . जी . भालेराव , एस . व्ही . पाटील , अरुण घोलप  , शरद पांढरे , अरुण मोरे ,  मधूकर पवार , एम आर कलाल  हिरालाल भामेरे ,  गणेश पांढरे ,  शंकर भामेरे आदींची यावेळी उपस्थिती होती . 

    प्रारंभी शाळेतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन आर . टी . देशमुख यांनी केले . आभार पर्यवेक्षक मधूकर आगारे यांनी मानले . या वेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



Post a Comment

0 Comments