दिशा लाईव्ह न्यूज। --::---(पाचोरा -:- अनिल आबा येवले)----
पाचोरा येथे आशीर्वाद ड्रीम सिटी मध्ये रहिवास असलेले सौ शारदाताई भावसार यांचे मूळ गाव गिरड तालुका भडगाव जिल्हा जळगाव असून त्यांनी 19 91 यावर्षी त्या नाशिक मध्ये पोलीस भरती झाल्या असून त्यांचे वडील पोलीस खात्यात 1970 यावर्षी पोलीस खात्यात भरती झाले असून त्यांनी बारा वर्षे सेवा केली असता ते मृत्यू झाले.
त्यांची अपूर्ण राहिलेली जनतेची सेवा पूर्ण करण्यासाठी शारदाताई भावसार यांनी अशी गाठ बांधली . पण वडिलांचे राहिलेले पोलीस खात्यातील अपूर्ण सेवा पूर्ण करण्याचा मानस केला व तो त्यांनी 1991 मध्ये भरती होत पूर्ण केला .
माझे वडील सहावीत असताना वारले होते ,तरी जिद्द व मनोकामना मनाशी बाळगून शिक्षण केले.आईला घरात मदत होईल म्हणून लोकांच्या शेतात काम करू लागले .तसेच मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करू लागले .योगायोगाने नाशिकला कुंभमेळ्याच्या वेळेस पोलीस भरती निघाली असता मी त्या ठिकाणी भरतीसाठी गेली असता माझा त्या ठिकाणी नंबर लागला व मी पोलीस भरती झाली त्यानंतर माझी पहिली पोस्टिंग महिला सेल नाशिक त्यानंतर ठाणे शहर तेथे चार वर्षे काढल्यानंतर मुख्यालयात काम केले .
त्यानंतर नाशिक शहर व देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन मिळाले त्यानंतर नाशिक रोड व नंतर जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पिंपळगाव हरेश्वर व नंतर पाचोरा पोलीस स्टेशनला सहा वर्ष सेवा केली ,असता पाचोरा शहरात मला खरोखर चांगले काम करण्याची संधी मिळाली .
पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील साहेब ,श्री अनिल शिंदे साहेब ,श्री राहुल खताळ साहेब ,श्री अशोक पवार साहेब यांनी मला उत्तम प्रकारे सहकार्य करून पोलीस खात्यातील मला चांगला अनुभव व अभ्यास पाचोरा पोलीस स्टेशनला अवगत झाला.
मी पाचोरा पोलीस स्टेशनला असताना एक्सीडेंट ची घटना घडली त्यावेळेस असंख्य जमाव जमला असता, मध्यस्थी करून तो वाद मिटवला होता.
सौ शारदाताई भावसार या एक डॅशिंग महिला कर्मचारी असून त्यांनी पाचोरा शहरात उत्कृष्ट पद्धतीने चांगले काम केल्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब यांनी त्यांना सन्मान दिला होता .
त्यानंतर त्यांची पाचोरा येथून कासोदा पोलीस स्टेशनला बदली झाली असता नुकतेच त्यांचे पोलीस खाते अंतर्गत चांगल्या कामाची दखल घेऊन श्री महेश्वर रेड्डी साहेब यांनी शासनातर्फे पीएसआय पदी प्रमोशन देऊन नियुक्ती केली असून त्यांच्या या प्रमोशनाने सर्वत्र पोलीस खात्यात अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments