दिशा लाईव्ह न्यूज (संजय सूर्यवंशी, शेंदूर्णी )– जामनेर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या शेंदूर्णी शहरातील आठवडे बाजार हा शेतकरी व नागरिकांसाठी जगण्यासाठीचा आधार आहे. परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून या बाजारपेठ कडे बघितले जाते.
मात्र या बाजाराला ना बसण्यासाठी ओटे, ना शेड, ना रस्ता, ना स्वच्छ पिण्याचे पाणी…कसलाही विकास नाही! गेल्या पाच वर्षांत मार्केट कमिटीने एक रुपयाचाही निधी दिला नाही, ही शरमेची बाब आहे.
शेतकरी जीव मुठीत धरून मेनगाव रोडवर भाजीपाला विकत आहेत. बाजाराला ठराविक जागा राहिलेली नाही. रस्त्यावर पाय ठेवायला मोकळे ठिकाण नाही. अशा परिस्थितीत मार्केट कमिटी मात्र फी वसूल करण्यात दंग आहे!
"जोपर्यंत बाजारात मुरूम टाकून रस्ते तयार होत नाहीत, शेड-ओटे उभे राहत नाहीत, साफसफाई होत नाही, तोपर्यंत कोणीही मार्केट कमिटीला एक रुपयाही फी द्यायची नाही! अन्याय सहन केला जाणार नाही. जिथे अन्याय तिथे शिवसेनेचा संघर्ष सुरूच राहील," असा संतप्त इशारा शिवसेना शेंदुर्णी शहरप्रमुख भैयाभाऊ गुजर यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेना नेते युवराज भाऊ बारी, जयहरी अशोकदादा बारी, संदीप भाऊ बारी, सुरेश जाधव दादा, तसेच गावातील मान्यवर आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments