दिशा लाईव्ह न्यूज:- : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाचोरा - भडगाव मतदार संघाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आज मुंबई येथे आयोजीत कार्यक्रमात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून या माध्यमातून त्या राजकीय क्षेत्रातील नवीन इनिंग सुरू करत आहेत.
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील मातब्बर राजकीय व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणाऱ्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आज मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात पक्षात प्रवेश घेतला.
प्रवेश घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आणि त्यांची सदिच्छा भेट व आशीर्वाद घेऊन ताईंनी प्रवेश केला.
जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांनी वैशालीताई सुर्यवंशी यांचे स्वागत केले. याप्रसंगी वैशालीताई यांच्यासोबत त्यांच्या हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.
जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी वैशालीताई सुर्यवंशी यांचे स्वागत करतांना त्यांच्या मुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात पक्षाची ताकद आता मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी वैशालीताईंच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील त्यांचे स्वागत केले.
भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपण आज भाजपमधून नवीन वाटचाल सुरू करत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, "माझे पिताश्री तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांनी दोनदा युतीचे आमदार म्हणून जनसेवेचा मापदंड प्रस्थापित केला होता. त्यांचा वारसा नेटाने पुढे नेण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. वडिलांचा जनसेवेचा वारसा कायम राखत आपली वाटचाल असेल" असे त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.
या प्रवेश सोहळ्याला जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, मंत्री नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, चिटणीस विजयभाऊ चौधरी आदींची उपस्थिती होती. यावेळी पाचोरा येथील भाजपाचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, , अमोलभाऊ शिंदे, मधुकर काटे, डी एम पाटील, सुभाष मुंडे, बंशीलाल पाटील, प्रदीप बापू पाटील, अनिल पाटील, गोविंद शेलार हे आवर्जून उपस्थित होते.
पक्ष प्रवेश करणाऱ्यांची नावे
यात प्रामुख्याने सौ. योजनाताई पाटील तालुका प्रमुख-भडगाव, मा. नगरसेविका, सौ. लक्ष्मी तुषार पाटील तालुका प्रमुख-पाचोरा, श्री. राजेंद्र देवरे मा.पंचायत समिती सभापती, पप्पूदादा पाटील वडजी मा. पंचायत समिती सभापती, शरद रमेश पाटील वेरुळी तालुका प्रमुख-पाचोरा, रतनसिंग मानसिंग परदेशी बांबरुड-विधानसभा क्षेत्र प्रमुख, अनिल रामराव देशमुख सारोळा उपतालुका प्रमुख -पाचोरा, मा सरपंच, प्रमोद सुधाकर पाटील, पुनगाव तालुका संघटक - मा. सरपंच, मनोहर चौधरी मा. नगरसेवक - भडगांव, अधिकार पाटील सांगवी प्र.लो. - सरपंच, पंढरी पाटील कुरंगी - मा. सरपंच, मिथुन वाघ राणीचे बांबरुड, मुकेश पाटील-खडकदेवळा, प्रदीप बोरसे - शिंदाड, सौ. वर्षाताई सागर वाघ राणीचे बांबरुड -मा. जि.प. सदस्य, रंजनाताई पाटील भडगांव मा. नगरसेविका, शिलाताई पाटील भडगाव तालुका संघटक, सविता शेळके आंबेवडगाव उप तालुका प्रमुख, उषाताई परदेशी भडगांव उपतालुका प्रमुख, कुंदन पांडया पाचोरा - शहरप्रमुख, मनिषा सुरेश पाटील भडगांव-शहरप्रमुख, सोनालीताई चौधरी-भडगाव शहरप्रमुख, निताताई भांडारकर भडगाव-उपशहरप्रमुख, सुरेखाताई वाघ भडगाव-उपशहरप्रमुख, सिंकदर तडवी-आदिवासी सेना जिल्हाध्यक्ष, मा. पंचायत समिती सभापती, रामकृष्ण अभिमन पाटील वडजी - मा. पं.स. सभापती, अशोक पुना सोनवणे, कजगांव - मा. पं.स. सदस्य, राजेंद्र झावरू पाटील खाजोळा मा. मार्केट कमीटी सभापती, राजेंद्र भिमराव पाटील पांढरद -उपसभापती मार्केट कमिटी, मच्छिंद्र पाटील पांढरद-शेतकरी संघ सदस्य, जे. के. पाटील तालुका प्रमुख-भडगांव, भाऊसाहेब संतोष पाटील उपतालुका प्रमुख, शामकांत जगन्नाथ पाटील - उपतालुका प्रमुख, कैलास तेली- खडकदेवळा - उपतालुकाप्रमुख, आनंदा चौधरी - शिंदाड - उपातालुका समन्वयक, पवन पवार- वरसाडे - सरपंच, मदन तडवी निंभोरी- सरपंच, दिनेश सुमेरसिंग पाटील कजगाव-मा. लोकनियुक्त सरपंच, दिलीप शेंडे भडगाव- काँग्रेस शहरप्रमुख, विजयसिंग राठोड- वरसाडे, दिलीप भाऊसाहेब पाटील तारखेडा - सहविभाग समन्वयक, अर्जुन आनंदा पाटील-तारखेडा, कैलास जनगन्नाथ पाटील-वाघुलखेडा, दिनकर पंढरीनाथ हवाळे- सारोळा, सुरेश रतिलाल चव्हाण आंबेवडगांव - सहगणप्रमुख उपसरपंच, पुरुषोत्तम रघुनाथ पाटील लोहटार- उपसरपंच, नामदेव पाटील नगरदेवळा-मा.सरपंच, जयसिंग राजपुत वडगांव स्वामी-मा. सरपंच, राजेंद्र गायकवाड सातगांव - मा. सरपंच, प्रविण पाटील- वाडे- मा. सरपंच, महेंद्र गणसिंग राजपुत वाघुलखेडा - मा सरपंच, संदीप रमेश पाटील वाघुलखेडा - मा. सरपंच, लक्ष्मण राठोड हनुमानवाडी -गणप्रमुख, मा. सरपंच, राजेंद्र महादु पाटील सातगांव - मा. सरपंच, अशोक पाटील लोणपिराचे - मा. सरपंच, माधव हाटेसिंग जगताप युवसेना उपजिल्हा प्र. , चेतन रविंद्र पाटील युवासेना तालुका प्र. , चेतन रंगनाथ पाटील -शहरप्रमुख, रोनीत सुभाष अहिरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख, उमेश हटकर विधानसभा क्षेत्रप्रमुख - पाचोरा, चंद्रकांत पाटील जारगांव-तालुका सरचिटणीस, रविंद्र चौधरी - उपतालुकाप्रमुख, महेंद्र एकनाथ माळी - उपतालुका प्रमुख, अनिल एकनाथ महाजन - शहरसंघटक, राजेंद्र पाटील- सार्वे - मा. ग्रा.पं. सदस्य, बापु गढरी आखातवाडे-मा.ग्रा.पं.सदस्य यांच्यासह अन्य पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.

.jpg)







Post a Comment
0 Comments