Type Here to Get Search Results !

लोहारा येथील अनेक सुखदुःखाची साक्ष देणारे झाड कोमजतेय-निसर्गप्रेमींना चिंता!

 


                                   आत्ताचे झाड

दिशा लाईव्ह न्यूज-(दिनेश चौधरी, लोहारा)  लोहारा, ता.पाचोरा येथील सोंननदीच्या तिरावर तर लोहारा शेंदूर्णी रोडवर असलेल्या या अत्यंत पुरातन ताडाच्या झाडाला जवळपास 125 वर्ष  पेक्षाही जास्त  वर्ष झाली असावीत असा अंदाज येथील जेष्ठ नागरिक रामदास लोहार (वय-105)  यांनी अंदाज वर्तविला आहे.

लोहारा नगरीतील रामदास  दशरथ लोहार (बाजारपेठ) हे जेष्ठ नागरिक आहेत,मुक्ती त्यांनी आपल्या वयाची 105 वर्ष पूर्ण केली आहे.

या झाडाबद्दल बोलतांना त्यांना  गहिवरून आलं होतं. मला आठवत नाही, मात्र मी लहानपणापासून बघतोय, हे झाड आहे तसेच दिसते, या झाडाने गावातील अनेक सुख-दुःख  बघितल्याचे त्यांनी सांगितले.



खरंय.... आजपर्यंत अगदी रुबाबदार दिसणार हे झाड...गेल्या 2 महिन्यांपासून त्याची पान वाळलेली दिसताय.. अखेरचा स्वास तर नाही घेत आहे ना? 

लोहारा गावाच्या  सौदर्यात या झाडाने आतापर्यंत नक्कीच भर घातलेली आहे. कितीतरी उन्हाळे, पावसाळे, हिवाळे या झाडाने बघितले आहे. कित्येक पाणीटंचाई या झाडाने सोसल्या आहेत.

3-4 दिवसांपूर्वी या झाडावर लक्ष गेलं.. (तसं मी नेहमीच बघतो.) 

वाईट वाटलं---बहुतेक वय झालं असावं...मात्र कित्येक आठवणींचा साठा या झाडाजवळ आहे.

लोहारा गावाच्या परिसरात अशी ठराविकच झाड राहिली आहे. त्यांच्यावर प्रेम करा! शक्यतो त्यांना वाचवा....



                           अगोदरचे झाड




Post a Comment

0 Comments