Type Here to Get Search Results !

पहूर येथे विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास ; राष्ट्रीय महामार्गावर झेब्रा क्रॉसिंगसह सिग्नल यंत्रणा बसवण्याची संतप्त पालकांची मागणी मागणी!! पालक सभेत एक मुखी ठराव.



            सौ.गीता भामेरे,पहूर, ता जामनेर. 

दिशा लाईव्ह न्यूज --::--शाळेत येता-जाता विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागत असल्याने 

शाळेजवळ झेब्रा क्रॉसिंग , सूचनाफलक , सिग्नल यंत्रणेसह गतिरोधक बसविण्याची एकमुखी मागणी पालक शिक्षक संघाच्या सहविचारसभेत   संतप्त पालकांनी केली .



जळगाव - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफवर असलेल्या महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थी दररोज ये -जा करतात . रस्ता क्रॉसिंग करताना चिमुकल्या मुलांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागते . शाळेतील शिक्षक रस्त्याजवळ विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून देण्यासाठी मदत करतात .

शाळेजवळ कोणत्याही प्रकारचे सूचना फलक , झेब्रा क्रॉसिंग , सिग्नल यंत्रणा बसविण्यात आलेली नसल्याने महामार्गावरून भरधाव वेगात वाहने येतात .  अशावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . 

          महामार्गावर शाळेजवळ तात्काळ सूचना फलक , झेब्रा क्रॉसिंग ,  सिग्नल यंत्रणा आणि गतिरोधक बसवण्याची मागणी  पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शंकर भामेरे यांच्यासह संतप्त पालकांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments