Type Here to Get Search Results !

पाळधी येथील चोरी प्रकरणी सव्वा सहा लाखाच्या मुद्देमालासह सात जण ताब्यात पहूर पोलिसांची कामगिरी



ईश्वर हिवाळे--,पहूर ता जामनेर.

दिशा लाईव्ह न्यूज -:-  जामनेर तालुक्यातील पाळधी येथील बँड व्यावसायिकाच्या बँडचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी पहुर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सात सात संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सुमारे सहा लाख सत्तावीस हजार रुपयांचे बेंडचे साहित्य जप्त केले आहे. 

  याबाबत बँड व्यावसायिक राहुल सदाशिव माळी यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पाळधी येथून बँड चे साहित्य चोरीला गेले होते. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी तात्काळ मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे चौकशी केली असता, भूषण प्रकाश पाटील, आर्यन विलास पाटील, ज्ञानेश्वर अशोक पाटील, शुभम ज्ञानेश्वर पाटील ,विशाल प्रकाश भुसारी, निखिल विनोद पाटील, वैभव रघुनाथ पाटील यांना ताब्यात घेतले असून सहा लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद पाटील ,गोपाल माळी, राहुल पाटील, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर कोकणे ,सत्यवान कोळी, एलसीबी चे ईश्वर पाटील, राहुल महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

पुढील तपास सुभाष पाटील करीत असून गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Post a Comment

0 Comments