Type Here to Get Search Results !

आई प्रतिष्ठान, कुऱ्हे पानाचे तर्फे 5 सप्टेंबर शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर...!

 



दिशा लाईव्ह न्यूज --::--(दिनेश चौधरी, लोहारा )   शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. 

शिक्षक हा नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी व देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारे उत्तम नागरिक घडवण्यासाठी मुलभूत स्वरूपाचे प्रयत्न करत असतो. 

इतर व्यवसायांमधून निवृत्त झाल्यानंतर व्यक्तींना "माजी" म्हणून संबोधले जाते, तर शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हृदयात चिरंतन "माझे शिक्षक" राहतात. हा फरक आपल्या समाजातील शिक्षकांचे अतुलनीय महत्त्व अधोरेखित करतो. 

पुढील काळात जगाचे नेतृत्व आजच्या आपल्या विद्यार्थ्यांनी केले पाहिजे त्यासाठी आपल्याला त्यांना सक्षम बनवायचे आहे. आणि त्यांना सक्षम बनवायचे काम हे राज्यातील अनेक गुणवंत, होतकरू व उपक्रमशील शिक्षक सेवाभावी वृत्तीने करत आहेत. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शासनाच्या विविध विभागाद्वारे व स्वयंसेवी संस्थांद्वारे आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. 



परंतु अनेक मेहनती, होतकरू व उपक्रमशील शिक्षक अशा पुरस्कारांपासून वंचित राहतात व त्यांचे कार्य समाजापर्यंत पोचत नाही. अशा शिक्षकांना ओळखून त्यांचा सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने या आई प्रतिष्ठान द्वारा सालाबादप्रमाणे या वर्षीही  आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५" चे आयोजन करण्यात येत आहे.

अशीच ही आदर्श संस्था आहे. आई प्रतिष्ठान, कुऱ्हे पानाचे तर्फे मानाचा समजला जाणारा "आदर्श शिक्षक" पुरस्कार  दरवर्षी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकाला प्रेरणा मिळावी तसेच त्यांच्या कार्याचा  सन्मान व्हावा या उद्देशाने दिला जातो.

    यावर्षी ५ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती शिक्षक दिनानिमित्ताने आई प्रतिष्ठान, कुऱ्हे पानाचे तर्फे खालील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 

सर्व शिक्षकांचे आई प्रतिष्ठान, कुऱ्हे पानाचे  व दिशा लाईव्ह न्यूज परिवारातर्फे तर्फे मनपूर्वक अभिनंदन...!

तसेच भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!

पुरस्कार वितरण समारंभ यथावकाश कळवण्यात येईल.

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांची यादी:


श्री रवींद्र दयाराम टोंगळे

(उपशिक्षक: अमजित चंदू पाटील माध्यमिक शाळा मनुर बु.)


श्री संतोष दामू वाघ (पर्यवेक्षक:  रा. धों. माध्यमिक विद्यालय, कुऱ्हे पानाचे)


श्री प्रवीण गोविंदा गांधेले 

(उपशिक्षक:  उच्च माध्यमिक विद्यालय, बामनोद)

श्री संजय देविदास नाईक (उपशिक्षक:  रा. धों. माध्यमिक विद्यालय, कुऱ्हे पानाचे)

श्री सुरेश शिवराम कापसे (उपशिक्षक के.नारखेडे विद्यालय भुसावळ)

सौ. आरती  राहुल निकम 

(उपशिक्षिका:  श्रीराम प्राथमिक विद्यालय, कुऱ्हे पानाचे)

सौ वैशाली प्रवीण सानप

(उपशिक्षिका:  जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा, कुऱ्हे पानाचे)


                       अध्यक्ष:

          आई प्रतिष्ठान, (कुऱ्हे पानाचे)

Post a Comment

0 Comments